ग्राम पंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे हात पंप बंद:-- ग्रा.प सदस्य अविनाश गणविर यांचा आरोप
ग्राम पंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे हात पंप बंद:-- ग्रा.प सदस्य अविनाश गणविर यांचा आरोप

दिनचर्या न्युज :-
चिमूर,(प्रतिनिधी)

ताडोबा अभयारण्याच्या पायथ्याशी असलेला चिमूर तालुक्यातील कोलारा (तु.) येथे मागील चार-पाच दिवसांपासुन गावकऱ्यांना पाण्याकरीता भटकती करावी लागत आहे. ग्राम पंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे गावातील काही हातपंप बंद असल्याने महिलांना पाण्याकरीता भटकंती करावी लागत आहे. असा आरोप ग्राम पंचायत सदस्य अविनाश गणविर यानी केला.

कोलारा (तु.) ग्राम पंचायत पंधरासे च्या जवळपास लोकसंख्या आहे. गावात दोन पाणी पिण्यासाठी विहीरी आहे. त्यामध्ये एक विहीर दोन महीण्यापासुन दूषीत पाणी असल्याने गावातील महीला एकाच विहीरीचा वापर करीत आहेत. गावात सोळा हजार लिटर ची पाण्याची टाकी असुन सुध्दा गावात योग्य पाणी मिळत नाही. पर्यायाने हात पंपाचा वापर करावा लागतो. मात्र, गावातील काही हातपंप पंधरा दिवसा पासुन नादूरस्त असल्याने महिलांना पाण्याकरीता भटकंती करावी लागते. कोलारा (तु.) ग्रामपंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे हात पंप बंद असल्याचा आरोप ग्राम पंचायत सदस्य अविनाश गणविर यानी केला आहे.


मागील मासीक मिटींग मध्ये गावातील हात पंप बंद असल्याने दूरस्त करण्यासंबधीत चर्चा करण्यात आली. दूरस्ती करण्यासंबधीत पंचायत समितीला लेखी तक्रार दयावी अशी सभागृहानी सुचना देऊन सुध्दा दूरस्त झाली नाही. ग्राम पंचायतच्या ढिसाळ नियोजनामुळे हात पंप बंद आहेत.

अविनाश गणविर   ग्रा.प सदस्य,

               कोलारा (तु.)