राज्यातील वंचित ओबीसी ला न्याय मिळवून दिल्या शिवाय शांत बसणार नाही - ओबीसी नेते कल्याण दळे
राज्यातील वंचित ओबीसी ला न्याय मिळवून दिल्या शिवाय शांत बसणार नाही -
ओबीसी नेते कल्याण दळे


दिनचर्या न्युज :-
उस्मानाबाद :-
राज्यातील वंचित ओबीसी समाज हे माझ घर आहे आणि माझ्या घरातील प्रत्येक सदस्याला न्याय मिळवून देने ही माझी नैतिक जबाबदारी आहे व ति जबाबदारी पूर्ण केल्या शिवाय मि शांत बसणार नाही असे प्रतिपादन ओबीसी नेते कल्यानराव दळे यांनी केले. कल्याणराव दळे यांच्या रूपाने राज्याला दूसरे कर्पूरी ठाकुर मिळाले असे प्रतिपादन ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी आर्गेनाईजेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीरजी अंसारी यांनी केले.
रोहिणी आयोग केंद्र सरकारने लागू करावा व ओबीसी च्या गणने नुसार त्यांना त्यांचा वाटा द्यावा या साठि 1 कोटि सह्यांचे पत्र देशाचे राष्ट्रपति व प्रधानमंत्री यांना देणार असल्याची माहिती यावेळी ओबीसी नेते कल्याण दळे यांनी दिली.
*राज्यातील बारा बलुतेदार, अलुतेदार, भटके विमुक्त व मुस्लिम ओबीसी असलेल्या वंचित ओबीसी चा मेळावा उस्मानाबाद येथे संपन्न झाला. राज्याचे ओबीसी नेते तथा प्रजा लोकशाही परिषद व बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष मा. कल्याणराव दळे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच राष्ट्रीय मुस्लिम ओबीसी आर्गेनाईजेशन चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. शब्बीरजी अंसारी यांच्या शुभ हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिति म्हणून गोर सेना राष्ट्रीय अध्यक्ष मा. संदेशजी चव्हाण, फकीरा दल प्रमुख सतिषजी कसबे, प्रजा सुराज्य पक्ष राष्ट्रीय अध्यक्ष दशरथजी राऊत, बारा बलुतेदार महासंघ प्रदेश उपाध्यक्ष प्रतापराव गुरव, धनंजयजी शिंगाड़े, राजेन्द्रजी बागुल, उत्तमराव सोलाने, रविभाऊ कोरे, मुकुंदजी मेटकर, लक्ष्मणराव माने, बाळासाहेब खोत, मोहनराव जगदाळे, विकासराव गवळी प्रामुख्याने उपस्थित होते.


दिनचर्या न्युज