वायगाव येथे गुराख्यावर वाघाने हमला करून केले जख्मी!

वायगाव येथे गुराख्यावर वाघाने हमला करून केले जख्मी!

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :- जवळ असलेल्या वायगाव येथे जंगलात गुरेढोरे चारण्यासाठी घेलेल्या रामदास कुमरे याच्यावर धब्बा धरून बसलेल्या वाघाने सायंकाळी पाच वाजता अचानक हमला करून त्याला जख्मी केले. नशीब बलवान म्हणून तो वाघाच्या हल्ल्यातून वाचला. यापूर्वी गावातील नागरिकांन वर अनेकदा वाघाने हमले केले आहेत . त्यामुळे गावातील नागरीकात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटणास्थळी वनविभागाने येवून जखमीला शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास वन अधिकारी चंद्रपूर करित असून गावातील नागरिकांनी वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.