ओबीसींच्या आरक्षणासाठी वज्रमुठ बांधण्याची गरज,ओबीसी आरक्षणाच्या विरोधात काम करणा-यांना बाजूला करा-छगन भुजबळ






ओबीसींच्या आरक्षणासाठी वज्रमुठ बांधण्याची गरज,ओबीसी आरक्षणाच्या विरोधात काम करणा-यांना बाजूला करा-छगन भुजबळ

चंद्रपूर येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी मेळावा संपन्न

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, :-
ओबीसी समाजावर सातत्याने अन्याय होत आला आहे. ओबीसींच्या प्रश्नांवर जो बोलतो त्याला त्रास देण्याचे काम सुरू आहे. मात्र कितीही त्रास दिला तरी ओबीसींच्या प्रश्नांसाठी बोलतच राहणार असे मत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. चंद्रपूर येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आयोजित ओबीसी मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस,राष्ट्रवादी ओबीसी विभाग, आणि आ.भा.महात्मा फुले समता परिषद तर्फे चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात ना.छगन भुजबळ यांच्या "कृतज्ञता सोहळा" कार्यक्रमा आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.मोरेश्वर टेमुर्डे,प्रमुख पाहुणे चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख श्री.सुबोध मोहिते,दुसरे संपर्क प्रमुख श्री.मधुकरराव कुकडे,प्रदेश ओबीसी विभागाचे अध्यक्ष श्री.ईश्वर बाळबुद्धे,म. फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष श्री.बापू भुजबळ,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,डॉ.अशोक जीवतोडे,महिला जिल्हाध्यक्षा बेबिताई उईके,सौ शोभाताई पोटदुखे, श्री.राजा राजापुरकर,समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री.जगदीश जुनगरी, व श्री.विजय लोनबले,राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री पंकज पवार व श्री बंडू डाखरे शहर अध्यक्ष श्री.राजीव कक्कड,नितीन भटारकर,श्री भालचंद्र चोपणे,ओबिसीचे प्रदेश उपाध्यक्ष श्री.हिराचंद बोरकुटे, महादेवराव पिदुरकर,जिल्ह्यातील ओबीसी वर्गातील विविध जातींचे प्रतिनिधी त्यात श्री.बबनराव फंड,श्री.बबनराव वानखेडे,महादेवराव पिदुरकर शेखर मुधोळकर, प्रा.योगेश दुधपचारे,किसनराव गरपल्लीवार,प्रदीप रत्नपारखी,आरिकर,श्री.माणिक लोणकर,विपीन झाडे,यांनी आद.ना.छगन भुजबळ साहेबांचा सत्कार केला.
यावेळी चंद्रपूर-गडचिरोली सह आठ जिल्हातील ओबीसींच्या कमी झालेल्या आरक्षणासाठी राज्य सरकारने मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून या समितीच्या शिफारशी राज्य सरकारने स्वीकारल्या आणि ओबीसींचे कमी झालेले आरक्षण पूर्ववत केले. याबद्दल मंत्री छगन भुजबळ यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की आज ओबीसी आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात काम करणा-यांना बाजूला करा. राज्य सरकार हे ओबीसी घटकाचे राजकीय आरक्षण टिकवण्यासाठी प्रत्येक मार्ग तपासून पाहत आहे.न्यायालयीन लढाई देखील राज्याची सुरू आहे मात्र न्यायालयाला हवी असलेला इंपिरिकल डाटा हा केंद्र सरकारकडे आहे. तो केंद्र सरकार द्यायला तयार नाही त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठे नुकसान होते आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले.ओबीसी आरक्षणाचा प्रश्न नेमका काय आहे हे समजावून सांगताना मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाचा इतिहासच जनतेसमोर मांडला.आरक्षणाच्या बाबतीत ओबीसीवर सतत अन्याय करणारी भाजप लोकशाहीच्या संविधानावरच घाला घालण्याचे काम करीत आहे. ओबीसीच्या मतासाठी उपयोग करुन भुलथापा देवून ओबीसींचा वापर करीत आहे. ओबीसीने चालविलेले मतासाठी अभियान ते दिल्लीत इंपेरिकल डाटा यासाठी केंद्रात लढा लढावा. तसेच माझयावर केलेला आरोप १०० कोटीच्या महाराष्ट् सदनाचा कामात साडे आठशे कोटीचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करुन आम्हास नाहक त्रास दिला. परंतू त्या प्रकरणातही न्यायालयाने आपणास दोषमुक्त केल्याचे ना. भुजबळ यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या नेत्यासह अनेक नेत्यांना भाजपाचे केंद्रातील सरकार अडकविण्याचे प्रयत्न करीत आहे. जेवढे अडकवण्याचे प्रयत्न करतील तेवढेच बिजेपीला जनता दुर करेल असे ना. भुजबळ म्हणले. यावेळी आरक्षणा साठी करावा लागलेला संघर्ष देखील श्री भुजबळ यांनी आपल्या भाषणातून मांडला. आज अनेक जण इतिहासाची मोडतोड करत आहेत महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे खोटे वारसदार आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी उभे केले जात आहेत मात्र जनतेने यांच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री.अरुण निमजे,सौ.मंगला आखरे,श्री बंडू डखरे,शरद जोगी,वासू सौंदरकर,ऋषी हेपट,सुमित समर्थ,रणजित चंदेल,मुनाज शेख,सुधाकर रोहनकर, डॉ.वऱ्हटे,सोनाली भुरसे,भुजंग ढोले,राजू मुरकुटे,विनोद नवघडे, मोंटू पिलारे,संतोष देरकर,सुरेश रामगुंडे,बादल उराडे,महादेव देवतळे,सूरज कौरासे, सूर्या अडबाले,डॉ.आनंद अडबाले,शरद मानकर,महेश जेंगठे,ज्योती रंगारी, असंख्य राष्ट्रवादी काँग्रेसचे, राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे पदाधिकारी,तसेच अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.