राजुरा येथे संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा





राजुरा येथे संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव साजरा

दिनचर्या न्युज :-
राजुरा:- श्री संत नगाजी महाराज देवस्थान राजुरा तसेच संत नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सव समिती राजुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संत शिरोमणी नगाजी महाराज यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन राजुरा येथे नगाजी समाज सेवा भवन येथे दिनांक 22 ऑक्टोंबर 2021 ला आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात पहाटे श्रींच्या स्थापनेने झाली असून नंतर संत नगाजी महाराज यांचे पोथी पुराण वाचन करण्यात आले. दुपारच्या सत्रात नगाजी महाराज यांचे चरित्र प्रवचन सौ. शुभांगी वाटेकर यांच्यातर्फे करण्यात आले, त्यानंतर समाजातील ज्येष्ठ नागरिक, गुणवंत विद्यार्थी व समाज भूषण व्यक्तिमत्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी राजुरा नगर परिषदेचे अध्यक्ष श्री अरुण भाऊ धोटे उपस्थित होते प्रमुख पाहुणे म्हणून एडवोकेट श्री वामनराव चटप माजी आमदार, श्री सुदर्शन निमकर माजी आमदार, श्री सुनील देशपांडे उपनगराध्यक्ष, श्री विजयराव वाटेकर अध्यक्ष नगाजी ज्ञान प्रसारक मंडळ राजुरा व समस्त नगाजी ज्ञान प्रसारक मंडळ सदस्य मंचावर विराजमान होते. समाज भूषण सत्कारमूर्ती म्हणून एडवोकेट रामभाऊ देवळीकर, राष्ट्रीय क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारार्थी कुमारी पूर्वा गणेशराव खेरकर, डॉक्टर अबोली प्रदीपराव वाटेकर, एडवोकेट रागिनी सुशील राजूरकर, श्री प्रतिक दिवाकर नक्षीने, श्री अभिषेक प्रदीपराव वाटेकर, कुमारी अक्षता मधुकर नक्षीने यांचा सत्कार करण्यात आला तसेच समाजातील विविध शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला मंचावर उपस्थित प्रमुख अतिथींचे नाभिक समाज बांधवांतर्फे सन्मान सत्कार करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात श्री अरुण धोटे यांनी समाजासाठी कार्यतत्पर असल्याचे आश्वासन दिले असून नगाजी देवस्थान परिसरात सामाजिक वाचनालय व विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह बांधून देण्यासाठी सहकार्य करण्याबाबत हमी दिली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नगाजी महाराज पुण्यतिथी महोत्सवाचे अध्यक्ष श्री मयूर गणेशराव खेरकर यांनी केले व प्रस्तावना श्री अरुण जमदाडे यांनी केली. सदर कार्यक्रमाला शेकडो समाजबांधव आपापले सलून प्रतिष्ठान बंद करून तसेच नोकरदार समाज बांधव सुट्टी काढून कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता पुण्यतिथी महोत्सव समिती सचिव श्री आकाश शंकर वाटेकर, श्री अभय हनुमंते, शंकर नागवेली, शिवा वाटेकर, प्रशांत वाटेकर, नंदू आंबेकर, उमेश वाटेकर, सुनील राजूरकर, अमरदीप नक्षीने, गजानन लांडगे, देवेंद्र राजूरकर, छोटू येसेकर यांनी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.