कार्यक्रमाचे स्थळ बदलले*
रंगशारदा सभागृह बांद्रा मुंबई
चलो मुंबई...चलो मुंबई
मुंबई येथे बाराबलुतेदार महासंघाचे राज्यव्यापी अधिवेशन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र राज्यातील बाराबलूतेदारांच्या सामाजिक,राजकीय,
*शैक्षणिक व आर्थिक समस्यांवर उपाययोजना*
*संधर्भात विचार विनिमय व धोरण ठरविण्यासाठी राज्यव्यापी पाहिले अधिवेशन मुंबई..बांद्रा येथील रंगशारदा सभागृहात दि.२/१२/२०२१ रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे.*
*अधिवेशनाच्या अध्यक्षस्तानी महासंघाचे अध्यक्ष मा.कल्याणजी दळे राहतील, उद्धघाटक राज्याचे ओबीसी कल्याण व पुनर्वसन मंत्री मा.ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे, ते बारा बलुतेदार, अलूतेदार, एसबिसी, मायक्रो ओबीसिंच्या अन्यायग्रस्त जातींच्या संविधानिक न्याय हक्कांसाठी मार्गदर्शन करणार असल्याची माहिती विश्वकर्मा विराट संघाचे अध्यक्ष व महासंघाचे सरचिटणीस श्री.चंद्रकांत गवळी यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्रकाद्वारे दिली.*
*देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झालीत. तरी ग्रामीण मजुरी, कौटुंबिक सेवा पुरविणारा, शेती औजारे, कला कौशल्यांची कामे, निवारा, उद्योग क्षेत्रात मिनी इंडस्ट्रीचा पाया ठरलेल्या बारा बलुतेदार धान्य स्वरूपात मोबदल्यावर वर्षानुवर्ष उदरनिर्वाह करत आलेल्या वर्गाच्या समस्या आजही तश्याच पूर्ववत आहेत. त्यांचे दुःख, दारिद्र्य, अवहेलना, अन्याय हे प्रश्न आजही सुटले नाहीत. त्यांची आर्थिक परिस्थिती तर अत्यंत डबघाईची आहे. करोना काळात तर फारच हाल झाले. ह्या वर्गाना सत्तेत सहभागा शिवाय त्यांची आर्थिक व सामाजिक स्थिती सुधारण्याबरोबर शिक्षणाचा स्थर उंचावण्यासाठी ठोस उपाय योजनांवर विचारमंथन होणार आहे.*
*मेळाव्यात महासंघाचे प्रमुख पदाधिकारी साहेबराव कुमावत (बेलदार) अशोक राऊत,बाळासाहेब सुतार रमेश आहेर (सुतार) सदाशिव हिवलेकार,विजय पोपालघट (लोहार) प्रतापराव गुरव (गुरव) सतीश दरेकर,अशोक सोनवणे,मोहन जगदाळे,भगवान श्रीमन दीलकर (कुंभार) भगवान वाघमारे, दामोधर बिडवे, (नाभिक) देवराज सोनटक्के,किसनराव जोर्वेकर,विशाल जाधव (धोबी) शशिकांत आमने,दत्तात्रय चेचर (कोष्टी) सतीश कसबे (मातंग) अर्जुन भोई (भोई) विजय बिरारी,रवींद्र बागुल (शिंपी) डी.आर.माळी (चर्मकार) राजेश पंडित, (सोनार) डी. एन. कोळी (कोळी) धनंजय शिंगाडे हे राज्यांचे अध्यक्ष उपस्थित रहातील.*
*राज्यातील सर्व बलुतेदार घटकातील बांधवांनी मुंबई येथील अधिवेशनास आवर्जून उपस्तीत रहाण्याचे आवाहन महासंघाचे राज्य सरचिटणीस श्री. चंद्रकांत गवळी यांनी केले असून श्री. विवेक राऊत यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
दिनचर्या न्युज