पत्रकार निलेश डाहाट यांच्यावर इंदिरानगर परिसरात शिवसेना कार्यकर्त्यांनी केला हल्ला

पत्रकार निलेश डाहाट यांच्यावर इंदिरानगर परिसरात शिवसेना कार्यकर्त्यांनी केला हल्ला

झालेल्या मारहाणीचे विधानसभेत पडसाद:

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जिल्ह्यात अवैध धंदे फलफुलत असून यातील राजकीय पाठबळ असलेले माफिया कोणती भिती न बाळगता अवैध धंदे सुरू आहेत. याबाबतच्या बातम्या प्रकाशित झाला तर सरास पत्रकारांवर हल्ले, किंवा खंडणीचा आव आणून मुस्कटदाबी
करण्याच्या प्रयत्न माफिया कडून केला जातो. असाच प्रकार चंद्रपूर शहरातील इंदिरानगर भागात शिवसेना कार्यकर्ते विक्रांत सहारे आणि पवन नगराळे यांनी प्रादेशिक वृत्तवाहिनीचे पत्रकार निलेश डाहाट यांना बेदम मारहाण केली. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत 27 डिसेंबर रोजी या हल्ल्याचा उल्लेख करत राज्यातील बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गृहमंत्र्यापुढे आणला.
इंदिरानगर भागात पत्रकार विनोद बदखल आणि डाहाट गप्पा करत होते. तेव्हा सहारे-नगराळे यांनी तेथे पोचत अवैध धंद्यांची बातमी प्रकाशित केल्यावरून वाद केला. तो शांतही झाला. मात्र घटनास्थळावरून घरी जाण्यासाठी निघालेल्या डाहाट यांचा सहारे, नगराळे जोडीने पाठलाग करून त्यांना रामबाग वसाहत वळणावरील मूल मार्गावरच्या माता मंदिराजवळ थांबवून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. रस्त्यावरील बांधकामाचे गट्टू त्यांना मारण्यात आले. शस्त्राचा आणि चाकूचा धाक दाखविला गेला. जबर जखम झाल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.
जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी, आणि सतत्याने पत्रकारांवर होणारे हल्ले यावर शासनाने गांभिर्याने घेऊन पत्रकार सरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी पत्रकार संघाच्या माध्यमातुन केली असून या घटनेचा तिव्र निषेध केला जात आहे.