कोरपणा कांग्रेसला स्पष्ट बहुमत! सर्व पक्ष एकवटले तरी कांग्रेसची मुसंडी! Chandrapur

कोरपणा कांग्रेसला स्पष्ट बहुमत! सर्व पक्ष एकवटले तरी कांग्रेसची मुसंडी!


दिनचर्या न्युज :- 

कोरपना - चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुकीचा विजयी गुलाल यंदा कांग्रेसने उडविला व आपले वर्चस्व या

निवडणुकीत सिद्ध केले.

मात्र कोरपना निवडणूक ही जिल्ह्यातील सर्वात रंगतदार राहिली

कारण कोरपना निवडणुकीत यंदा कांग्रेस ही युती न करता लढली व कांग्रेस विरोधात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, शेतकरी संघटना यांनी युती करीत कांग्रेसला टक्कर देण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व पक्ष निवडणूक निकालात तोंडघशी पडले.

17 सदस्यीय कोरपना नगरपंचायत जागेवर कांग्रेसने 12 जागेवर विजय मिळवीत कोरपना नगरपंचायत वर एकहाती सत्ता

मिळविली.

उर्वरित 4 जागेवर भाजप तर 1 जागेवर शेतकरी संघटनेला

समाधान मानावे लागले.