श्री संत गाडगेबाबा जयंती कार्यक्रमा निमित्य शासकीय रुग्णालयात फळ वाटप व रक्तदान शिबिर
श्री संत गाडगेबाबा जयंती कार्यक्रमा निमित्य शासकीय रुग्णालयात फळ वाटप व रक्तदान शिबिर

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
बुधवार दिनांक २३.०२.२०२२सकाळी १०.०० वा. श्री संत गाडगे महाराज स्मृती सभागृह दादमहल वार्ड येथे श्री संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर सोनारकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत फळवाटप करण्यात आले. त्यानंतर माननीय डॉक्टर हजारे साहेब यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी रक्तदाते माजी नगरसेवक संजय भाऊ वैद्य यांनी 109 वेळा रक्तदान करून समाजसेवेचे कार्य केले आहे. त्याचबरोबर समाज सेवक सुरेशभाऊ बंडिवार यांनीही यावेळी रक्तदान केले .यांच्यासोबत संघटनेचे अध्यक्ष अनिल तुंगडीवार, सुरेश बंडिवार, अक्षय वडुरकर, हिरालाल चौधरी, मोहन आतुरकर, सुरेश तुंगडी वार, प्लस बंडीवार, विठ्ठल अंडेलवार, पन्नालाल चौधरी, यांनी रक्तदान केले. संत गाडगेबाबा जयंती चे निमित्त त्यांना विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष म्हणाले की जे गाडगेबाबांनी समाजसेवेचे कार्य केले. ती परंपरा समाजाने जोपासून सतत कार्य करत राहणे. हीच खरी श्रद्धांजली ठरेल.शासकीय रूग्णालय चंद्रपूर येथे १०.३० वा. रूग्णांना फळवाटपकरण्यात आले. रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
चंद्रपूर रेल्वे स्टेशन येथे ११.३० वा. गरीब गरजूंना फळ वाटप.
डेबु सावली वृध्दाश्रम येथे १२.०० वा. बिस्किट, तोस पॅकीट वाटप तथा भोजन वाटपाचे कार्यक्रम आयोजित केले आहे. समाज सेवक सुरेश भाऊ बंडीवर यांच्या आयोजनातून सर्व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.