भाजयुमों ने शहरातील देशी दारू दुकाने शहराबाहेर हलविण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांसह नगरसेवकांकडे साकडे !





भाजयुमों ने शहरातील देशी दारू दुकाने शहराबाहेर हलविण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांसह नगरसेवकांकडे साकडे !


गडचांदूर शहरातील देशी दारू दुकाने शहराबाहेर हलविण्यासाठी शहर भाजयुमो सरसावली !

मासिक सभा घेणेबाबत मुख्याधिकाऱ्यांसह नगरसेवकांकडे साकडे !

जिल्हा उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी यांना ही दिले निवेदन !

दिनचर्या न्युज :-
गडचांदूर (प्रति.) : अत्यंत गजबजलेल्या गडचांदूर शहरामधील दुकाने शहराबाहेर हलविण्यात यावी, यासाठी शहर भाजयुमो ने गडचांदुर चे मुख्याधिकाऱ्यांना मासिक सभा घेण्यात यावी, यासाठी २४ जानेवारी रोजी निवेदन दिले असुन यासोबतचं सत्तेमध्ये असलेले न.प. चे उपाध्यक्ष शरद जोगी, नगरसेविका सौ. सु. गोरे, नगरसेवक अरविंद मेश्राम, सौ. कल्पना निमजे, सुनिता कोडापे यांचेकडे साकडे घातले असल्यामुळे न.प. मध्ये मासिक ठराव घेतल्या जाईल काय ? याकडे आता सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. जिल्हा उत्पादन शुल्क विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय यांना ही भाजयुमों ने शहरातील देशी दारू दुकाने शहराबाहेर हलविण्यात यावी अशी मागणी केली आहे. महत्वाचे म्हणजे यापूर्वी ही अनेक संघटना व पत्रकार संघाच्या माध्यमातून ही अशी मागणी करण्यात आली होती. जनतेच्या आरोग्याशी व नागरिकांना होणाऱ्या जाचाला मुक्ती मिळण्यासाठी देण्यात आलेल्या या निवेदनाला संबंधित विभागाकडून केराची टोपली दाखविण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की, गडचांदूर शहराचे अत्यंत मध्यभागी देशी दुकाने सुरू झालेली आहेत. शहरातील वाघोबाचे मंदिर या वर्दळीच्या ठिकाणी गुलाब शेंद्रे यांची तर स्टेट बँकेच्या अगदी शेजारला रऊफ खान बजीर खान यांचे दारूचे दुकान आहे. या व्यतिरिक्त राजीव गांधी चौक येथे भाऊराव रणदिवे, शहीद बिरसा मुंडा चौक येथे दिगांबर लांजेकर व तर दुकाने आहेत. अत्यंत वर्दळीच्या जागेवर असलेल्या या देशी दारू दुकानांमुळे नागरिकांना भयानक त्रास सहन करावा लागत असल्यामुळे ही देशी दारु दुकाने शहराबाहेर हलविण्यासाठी सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, पत्रकार संघ यांनी निवेदने दिलेली आहेत. आता चक्क नगरपरिषदेने मासिक ठराव घेऊन ही देशी दारु दुकाने शहराबाहेर हलविण्याची मागणी नगरसेवकांना केल्यामुळे नगरसेवक मासिक ठराव घेतात ही या जनसमस्येकडे दुर्लक्ष करतात, हे बघणे गरजेचे आहे.