चंद्रपूर जिल्ह्यातील महाघोटाळा उघडकीस, कर्जधारक, एजंट व बॅक अधीकाऱ्यांनाअटक




चंद्रपूर जिल्ह्यातील महाघोटाळा उघडकीस, कर्जधारक, एजंट व बॅक अधीकाऱ्यांनाअटक

स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेकडुन बनावट आयकर रिटर्न दाखवुन बॅकेची फसवणुक करणाऱ्या कर्जधारक, एजंट व बॅक अधीकाऱ्यांनाअटक.

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
देशातील अग्रगण्य बँक म्हणून ओळखल्या जाणारी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चंद्रपूर शाखेला कोट्यवधी रुपयांचा चुना काही प्रतिष्ठित व डेव्हलपर्स, नावाजलेल्या व्यक्तींनी लावल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे, सदरचा महाघोटाळा उघडकीस आणण्यासाठी राष्ट्रवादी कांग्रेसचे शहराध्यक्ष राजीव कक्कड यांनी तक्रार केली होती. कक्कड यांच्या समयसूचकते मुळे कोट्यवधी रुपयांचा अपहार उघडकीस आला.
4 जानेवारी 2020 ला देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडे कक्कड यांनी तक्रार दिली होती.
पोस्टे रामनगर येथे दि.०८/०३/२०२० रोजी फिर्यादी नामे संजोग अरुणकुमार भागवतकर, श्रेत्रीय प्रबंधक, स्टेट बँक ऑफ इंडिया मुख्य शाखा कार्यालय चंद्रपुर यांचे लेखी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन रामनगर येथे अप कं. २६७/२०२० कलम ४२०,४०६,४०९, ४१७, ४६५, ४६६, ४६७,४६८, ४७१,१२०(ब) भां.द. वी. चा गुन्हा दाखल आहे. त्यामध्ये चंद्रपुर जिल्हयातील स्टेट बॅक ऑफ इंडिया कडे ४४ कर्ज प्रकरणात कर्जधारकांनी बनावट आयकर रिटर्न तयार करुन एजंट मार्फत गृह कर्जासाठी अर्ज केले. सदर प्रकरणी कर्ज प्रकरणाची नियमानुसार पडताळणी न झाल्याने मुल्याकंनापेक्षा जास्तीच्या रक्कमेचे गृहकर्जामध्ये वाटप झाले. कर्ज वाटपानंतरच्या तपासणी मध्ये बॅकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बॅकेची एकुण १४, २६, ६१,७०० /- रु. चे फसवणुक झाल्याची बाब लक्षात आल्याने त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली होती.

नमुद गुन्हयाचा तपास प्रकरण कर्जधारकांनी बनावट आयकर रिटर्न तयार करुन बँकेस सादर केल्याचे निष्पन्न झाल्याने एकुण ११ कर्जधारक, एजंट ०१ व बॅकेचे ०३ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. सदर प्रकरण पोलीस अधिक्षक श्री. अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक दिपक मस्के ( आर्थिक गुन्हे शाखा) अधिक तपास करत आहेत.