चंद्रपूर सिटीपीएस परिसरातील आणखी तीन वाघाचा बंदोबस्त करा - नितीन भटारकरचंद्रपूर सिटीपीएस परिसरातील आणखी तीन वाघाचा बंदोबस्त करा - नितीन भटारकर

चंद्रपूर वनविभागातील चंद्रपूर वनपरीक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे परीसरात वावर असलेल्या वाघ (मादी-१) व (नर-२) Sub adults बाघांना जेरबंद करण्याच्या आदेशाचा तात्काळ कालावधी वाढवा :- मा. मुख्यमंत्री, म. रा. यांचेकडे नितीन भटारकर यांची मागणी.

संपर्कमंत्री मा.प्राजक्त तनपुरे यांनी वन राज्यमंत्री मा. दत्तात्रय भरणे यांना बैठक लावने संदर्भात दिले पत्र.

तसेच मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षेतखाली दिनांक १२/१०/२०२९ रोजी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या १७ व्या बैठकीत महाराष्ट्र शासणाने स्थापण केलेल्या अभ्यासगटाने दिलेल्या ज्या अहवालास मान्यता / स्विकृती देण्यात आली त्याची तात्काळ अमलबजावणी करा.

संदर्भ: मा. मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्रमांक:- कक्ष-२३ (४) /प्र.क्र.१२९/ जेरबंद/ २९७४/२०२१-२२ दिनांक चे १८/०२/२२ चे पत्र.

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:- तालुका-जिल्हा चंद्रपूर येथील चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, उर्जानगर, डब्ल्यु.सी.एल. कॉलनी, दुर्गापूर व लगतच्या नेरी-कोंढी परीसरात वाघ, बिबट व अस्वल यांच्या संख्येत वाढ होऊन राहिवासी वस्त्यांमध्ये फिरत असल्याने वन विभागाने तात्काळ उपायोजना कराव्या याकरीता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर हे मागील ३ वर्षांपासुन वनविभागाच्या संबंधीत अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करीत होते. मात्र सन २०१९ पासुन देण्यात आलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने वनविभागातर्फे कोणतीही सकारात्मक कार्यवाही करण्यात आली नव्हती.

मानव व वन्यजीव संघर्ष वाढणार हि भिती अनेक पर्यावरणवाद्यांतर्फे अनेकदा व्यक्त करण्यात येत होती ती खरी ठरीत चंद्रपूर येथील चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्र, उर्जानगर, डब्ल्यु.सी.एल. कॉलनी, दुर्गापूर व लगतच्या नेरी-कोंढी परीसरातील राजेश नागेश्वर गुजलवार वय २६ वर्षे यांना दिनांक ०९/०१/२०१९ सिनाळा येथे वाघाने ठार केले, दिनांक ०३/१०/२०१९ ला महेश रामा ठाकरे वय ६५ वर्ष यांना सिनाळा येथे शेतशिवारात वाघाने ठार केले. दिनांक ३०/०४/२०२० ला लता पांडूरग सुरपाम वय ५५ वर्ष यांना आगरझरी येथे वाघाने ठार केले. दिनांक २६/०८/२०२० ला उर्जानगर वसाहतीतून ५ वर्षाच्या लावन्या उमाशंकर धांडेकर या मुलीला आईच्या डोळयादेखत बिबटयाने उचलून नेत ठार केले, दिनांक १७/०१/२०२१ ला मनोज जनार्धन दुर्योधन वय ३५ वर्ष यांना डब्ल्यु.सी.एल. दुर्गापूर परीसरात वाघने ठार केले, दिनांक १६/०२/२०२१ ला नरेश वामण सोनवने वय ४० वर्ष यांना डब्ल्यु.सी.एल. पदमापूर परीसरात वाघने ठार केले, दिनांक २७/०९/२०२९ ला जोगेश्वर कारु रत्नपारखी वय ७० वर्षे यांना दुर्गापुर डब्ल्यूसीएल डंपिंगयार्ड परिसरात वाघाने ठार केले. दिनांक ०८/१०/२०२९ ला बबलू सिबील सिंग वय २८ वर्ष यांना डब्ल्यु.सी.एल. दुर्गापूर परीसरात वाघाने ठार केले, दिनांक ०२/११/२०२९ ला पितांबर गोदरु तोरे बय ६५ वर्ष यांना मोहर्ली जंगल परीसरात वाघाने ठार केले. दिनांक १२/११/२०२१ ला अनिल जोगेश्वर गुंजनकर वय ४५ वर्ष यांना डब्ल्यु.सी.एल. दुर्गापूर परीसरात वाघाने ठार केले, दिनांक १७/०२/२०२२ ला च.म.ओ.वि. केंद्रात वाघाने सायकलस्वार श्री. भोजराज मेश्राम यांच्यावर हल्ला करीत ठार केले. तसेच सलग दुसऱ्या दिवशी दिनांक १८/०२/२०२२ ला १६ वर्षीय श्री. राज उमेश भडके या युवकाला बिबटयाने डब्ल्यु.सी.एल. दुर्गापूर परीसरात हल्ला करीत ठार केले होते, असे या क्षेत्रातील अल्पावधीतच १२ नागरीकांचा बळी गेला आहे.

तसेच या वन्यप्राण्यांच्या हल्यात या परिसरातील अनेक नागरीक गंभीररित्या जखमी झाले असुन भटाडी येथे वे को.ली. च्या कामगारावर अस्वलीने हमला करीत गंभीर जखमी केले होते, दिनांक ०२/१२/२१ ला पटटेदार वाघाने च.म.ओ.वि.के. च्या दुचाकीस्वार कामगारावर हल्ला केला होता परंतु त्यांच्या मागे असलेल्या इतर कर्मचारयांनी आरडाओरड केल्याने तो कर्मचारी किरकोळ जखमी होत थोडक्यात बचावला होता.

या सतत होणाऱ्या गंभीर घटनांवर नियंत्रण यावे याकरीता वनविभागाने उपाययोजणा कराव्या यासंदर्भात अनेकदा नितिन भटारकर यांनी निवेदने दिली होती. मात्र वनविभागाने कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना न केल्यानेच सदर गंभीर घटना घडल्या व निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला असा आरोप भटारकर यांनी केला.

वनविभागाच्या ढिसाळ व नियोजनशुण्य कारभारामुळेच सतत निष्पाप नागरीकांचा जिव जात असल्याने शेवटी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर हे स्वतः दिनांक १६/०२/२०२२ ला वनविभागाच्या निषेधार्थ आमरण उपोषणाला बसले तेव्हा जिल्हा प्रशासन व वनविभागाच्या हालचालींना वेग येत च.म.ओ.वि.केंद्र प्रकल्पाच्या आवारात असलेल्या पट्टेदार १ मादी व २ नर अश्या एकुन ३ वाघांना जेरबंद करून इतरत्र अधिवासात हलविण्याची विशेष बाब म्हणून अनुमती / परवानगी देण्यात आली होती.

चंद्रपूर जिल्हयात मानव-वाघ संघर्षाबाबत अभ्यासासाठी महाराष्ट्र शासणाने स्थापण केलेल्या अभ्यासगटाने सुध्दा त्यांचे अहवालात क्षेत्राची वर्गवारी केलेली असुन शहरी भागातील मानवी वसाहतीजवळ अधिवास असलेल्या वाघ व इतर हिस्त्र वन्यप्राण्यांना हलविण्याबाबत शिफारस केलेली होती. सदर अभ्यास गटाच्या अहवालास मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षेतखाली दिनांक १२/१०/२०२१ रोजी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या १७ व्या बैठकीत मान्यता / स्विकृती देखील देण्यात आलेली आहे.

सदर पार्श्वभूमी तसेच या संबंधात पर्यावरण व वन मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्गदर्शक सुचना लक्षात घेता मा. सुनिलजी लिमये, मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांची खात्री झाली असल्याने यांच्यातर्फे शहरालगत उपरोक्त परिसरात झालेली मानवी हानी व मानवी जिवीतास असलेला संभाव्य धोका लक्षात घेता १ मादी व २ नर अश्या एकुण ३ पट्टेदार बाघांना जेरबंद करणे आवश्यक असल्याने वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ चे कलम १९(१) (क) अन्वये वाघांना जेरबंद करण्याच्या लेखी आदेश दिनांक १८/०२/२०२२ ला पारीत करण्यात आला होता.

परंतु धुमाकुळ घालत असलेल्या व मानवी जिवीतास धोकादायक ठरलेल्या ३ वाघांना पिंजराबंद करण्यास तसेच गरजेप्रमाणे तंज्ञाचे उपस्थितीत व पर्यावरण व वन मंत्रालय, भारत सरकार यांचे मार्गदर्शक सूचनेत नमुद केल्यानुसार बेशुध्द करून बंदीस्त करण्याची जी मंजुरी देण्यात आली आहे ती मंजुरी दिनांक ३१ मार्च २०२२ पर्यंतच वैध आहे.

ज्या ३ वाघांना बेशुध्द करून जेरबंद करण्याची परवानगी देण्यात आली त्यापैकी एकाही वाघांना जेरबंद करण्यात वनविभागाला अजुनपर्यंत यश आलेले नसुन सुदवाने या मधल्या कालावधीत या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांची जिवीतहानी झालेली नाही. परंतु भविष्यात जिवितहानी होण्याचे नाकारता येणार नाही व म्हणून मा. मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी वाघांना जेरबंद करण्याच्या दिलेल्या आदेशाचा तात्काळ कालावधी वाढवीने संदर्भात संबंधीत अधिकाऱ्यांना निर्देश दयावे ही विनंती करण्यात आली.

तसेच मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १२/१०/२०२१ रोजी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या १७ व्या बैठकीत शासनाने स्थापण केलेल्या अभ्यासगटाने चंद्रपूर शहरी भागातील मानवी वसाहतीजवळ अधिवास असलेल्या वाघ, बिबट, अस्वल व इतर हिंस्त्र वन्यप्राण्यांना हलविण्याबाबत दिलेल्या अहवालास मान्यता /स्विकृती दिली असल्याने तात्काळ चंद्रपूर शहरातील व लगतच्या उर्जानगर व दुर्गापूर परिसरातील सर्व हिस्त्र प्राण्यांना जेरबंद करून इतरत्र हलविण्याची कार्यवाही करावी या करिता आवश्यक निर्देश संबधीतांना दयावे, तसेच या गंभीर विषयासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक आयोजीत करुन महत्वाच्या ज्या शासन स्तरावरील परवानग्या असेल त्या देण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.

सदर गंभीर विषयावर तात्काळ उपाययोजना झाल्यास मानव-वन्यजीव संघर्ष व जिवीतहाणी सुध्दा टळणार करीता तात्काळ संबधीतांना योग्य कार्यवाही करून या भागातील मानवी वसाहतीजवळ अधिवास असलेल्या वाघ, बिबट, अस्वल व इतर हिस्त्र वन्यप्राण्यांना हलविण्या संबंधाने निर्देश दयावे याकरिता जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना.श्री. विजय वडेट्टीवार साहेब, जिल्ह्याचे संपर्कमंत्री मा. ना.श्री. प्राजक्त तनपुरे साहेब, महाराष्ट्र राज्याचे वन राज्यमंत्री मा. ना. श्री. दत्तात्रय भरणे साहेब, मा. जिल्हाधिकारी साहेब, चंद्रपूर व मा. पोलीस अधीक्षक साहेब, चंद्रपूर यांना भेटून मागणी करण्यात आली आहे.