प्रभाग पध्दत बंद करा - वार्ड पध्दत लागु करा - : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी -ओबीसी विभाग चंद्रपुर




प्रभाग पध्दत बंद करा - वार्ड पध्दत लागु करा- : राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी -ओबीसी विभाग चंद्रपुर

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-

राज्यात होवू घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था , नगर परिषदा व महानगर पालिकांच्या निवडणुका यां प्रभाग पद्धतीने घेण्यात येणार असे समजते.
या निवडणुका जर प्रभाग आधारित घेतल्यास त्यात २ ते ४ वार्डांचा प्रभाग गठीत केल्याचे मागील निवडणुका वरून दिसून आले आहे. अश्या प्रभाग रचने मुळे मतदारांची संख्या जास्त असते आणि त्या मुळे या निवडणुकाचा प्रचार करण्यासाठी उमेदवारांना फार अडचणीचे व प्रचंड खर्चाची बाब बनते. या प्रकारामुळे वार्डात चांगले काम करणाऱ्या होतकरू व सामान्य उमेदवाराला आर्थिक अडचणीमुळे निवडणूक लढणे अशक्यप्राय होते ,  परिणामत:  निवडणूक ही श्रीमंत अथवा धनदांडग्यांची मिरासदारी बनते, आणि लोकशाहीच्या,” सामान्य माणसांच्या प्रतीनिधित्व” या उद्धेशाला मारक ठरते, आणि लोकशाही हि सामन्यांची न राहता ती धनदांडग्यांची  बटिक होते. या उलट जर ती वार्ड निहाय घेतल्यास, लोकांत काम करणाऱ्या गरीब पण होतकरू कार्यकर्त्याला प्रतिनिधित्वाची संधी मिळत असते, जे घटनेला व घटनाकारांना अपेक्षित होते. 
तसेच एका प्रभागात २ ते ४ नगरसेवक निवडून आल्या मुळे वार्डातील कामे एकमेकावर ढकलण्याचेही काम होत असते, त्यामुळे नागरिक त्रस्त होतात व कोणा एकाला जबाबदार धरता येत नाही .
महोदय, उपरोक्त निवेदनाचा गांभीर्याने विचार करून आगामी येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही प्रभाग निहाय न घेता ती वार्ड निहाय घेवून लोकाशाहीला खऱ्या अर्थाने बळकट करू असे निवेदन  
मा. ना.उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री,मा.ना. अजितदादा पवार उपमुख्यमंत्री,मा.ना.छगनजी भुजबळ अन्न व नागरी पुरवठा मंत्री   (महाराष्ट्र राज्य ) यांना जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचे मार्फत देण्यात आले.निवेदन देते मा  . हिराचंद बोरकुटे , डी के आरीकर, बंडुजी डाखरे , सुर्या अडबाले ,भावीक लोनकर , बेबीताई उईके , विपीन झाडे , माधव गुरनुले , रुपेश लभाने , प्रशांत आसुटकर , दिपक जैसवाल , शारदा धांदे , मनोहर जाधव , प्रशांत भरतकर , महेन्द्र शेरकी ,चारुशिला बारसागडे , रेखा जाधव , हर्षल भुरे , पी एस आरीकर , विपीन लभाने, निरुलवार  उपस्थित होते.

दिनचर्या न्युज