कलकाम रियल इन्फ्रा इस्टेट घोटाळा मनसेचा गट आमने-सामने मात्र गुंतवणूकदारांची गोची!
कलकाम रियल इन्फ्रा इस्टेट घोटाळा, मनसेचा गट आमने-सामने मात्र गुंतवणूकदारांची गोची!

चंद्रपूर
कलकाम रियल इन्फ्रा इस्टेट या कंपनी कडून गुंतवणूकदारांची करोडोंची फसवणूक झाल्याची पत्रकार परिषद मनसेचे राजू कुकडे यांनी काल रत्नमाला चहारे, व मंगला लोणारे, यांच्यासह पत्रकार परिषद घेवुन कंपनीत झालेल्या घोटाळ्याची माहिती उघड केली होती. तशी त्यांनी पोलीस अधीक्षक यांच्या कडे रितसर तक्रारही दाखल केली गेली आहे. चौकशी झाल्यास मोठे गबाळ बाहेर असे आरोपही यावेळी केले.
मात्र आज त्याच पत्रकार परिषदेचे खंडन करण्यासाठी मनसेचे भारत गुप्‍ता, प्रतिमा ठाकूर, यांनी आमच्यावर काल केलेल्या पत्रकार परिषदेचे आरोप हे बिनबुडाचे असून उलट आम्ही त्यांना पैसे काढून दिल्याचं पत्रकार परिषदेत सांगितले.
मात्र मनसेचे दोन्ही गट समोर आल्याने काय खरे आणि काय खोटे यात तर्कवितर्क लावले जात असून गुंतवणूकदारांची गोची होत आहे.गुंतवणूकदारांना त्यांचे गुंतवणूक केलेले पैसे वापस मिळेल का हा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला?
संबंधित कंपनीने कंपनीच्या व्यवस्थापकाला सह येऊन गुंतवणूकदारांना पत्रकार परिषदेत घेऊन त्यांना गुंतवणूक केलेल्या पैशाची हमी द्यावी! संबंधित कंपनीचे चंद्रपूरातील कार्यालय बंद असून कंपनीचा कमिशन एजंट बनून रामटेके व येरगुडे यांनी संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकाला चंद्रपुरात आणून पत्रकारांसमोर गुंतवणूकदारांना गुंतवणूक झालेल्या पैशाची हमी द्यावी तरच हजारो लोकांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळेल. काही गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे. आम्हाला वाद नको, तर आम्ही गुंतवणूक केलेला पैसे आम्हाला परत हवे आहेत.