स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी , सामूहिक विवाह सोहळाला 305 जोडपी विवाहाबध्द






स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी , सामूहिक विवाह सोहळाला 305 जोडपी विवाहाबध्द

माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

" आम्हालाही कधी एकदा आशीर्वाद द्यावा"- सुधीर मुनगंटीवार

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर
दाताळा मार्गावरील श्री बालाजी मंदिर देवस्थानाच्या भव्य पटांगणात नेत्रदीपक सोहळा पार पडला. यावेळी तीनशे पाच नवविवाहित जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी माजी खासदार नरेश बाबू पुगलिया यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तसेच चंद्रपूर वणी आरणी लोकसभा क्षेत्राचे खासदार बाळू धानोरकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार अ एड.वामनराव चटप, निर्दोष बाबू पुगलिया, भाजपचे नगर जिल्हा अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनायक बांगडे, सुभाष गौर, एडवोकेट विजय मोगरे, वैशाली वासाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक दीपक जयस्वाल, आदी विविध पक्षाचे राजकीय नेते, माझी नगरसेवक, सामाजिक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. विविध जाती-धर्माच्या वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या सर्व जाती-धर्माच्या लोकांची उपस्थिती होती. उपस्थित उपवर-वधू ना त्यांच्या धर्मानुसार त्यांच्या वेशभूषा करण्यात आली होती. साडी चोळी, प्रत्येक जुळताना मंगळसूत्र, ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत वधूवरांना मंडपात आणण्यात आले. सर्व धर्माचे विवाह त्यांच्या समाज पद्धतीने लावण्यात आले. सुरुवातीला ख्रिश्चन धर्माचे, हिंदू धर्माचे, बौद्ध धर्माचे, इस्लाम धर्माचे, याप्रमाणे समाजाच्या रीतीरिवाजाप्रमाणे विवाह करण्यात आले.
भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजक माजी खासदार नरेश पुगलिया त्यांनी नवदांपत्यांना आशीर्वाद देताना म्हटले की ,आपल्या भावी जीवनात जीवन जगत असताना सुख समाधानाने आपले आयुष्य जगावे, आतापर्यंत झालेल्या कार्यक्रमात बाळू भाऊ नेहमी आशीर्वाद द्यायला येतात. मात्र पहिल्यांदा सुधीर या कार्यक्रमात नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत. आणि यापुढे ते येत राहतील असे मार्मिक उद्गार काढले. निवडून आलेले सर्व नेता हे काम करणारे प्रतिनिधी आहेत. बाळू आहेतच पण प्रतिभा हा त्यांच्यापेक्षा तेज आहेत. दोन अडीच वर्षातले कामे मी बघितले आहे. भविष्यात बाळू ला हा मागे टाकेल असे वाटते. कामासाठी शाळेतील शिक्षकांनी फार मोलाची मदत केली. या कार्यक्रमाला विवाह जोडपे आणण्यासाठी बऱ्याच समाजशील कार्यकर्त्यांनी मदत केली. भगवान बालाजीला आवडणारे गोड पदार्थ म्हणून या आक्रमक कार्यक्रमात 56 भोगाचे पकवान ठेवण्यात आले आहेत. यात 175 विवाह जोडप्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र प्रसारमाध्यमाच्या सहकार्याने या कार्यक्रमाला 305 जोडपी एकाच वेळी एकाच मंडपात विवाहबद्ध झाली. कार्यक्रमात नव वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले खासदार बाळू धानोरकर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्ष हे सर्व इकडे साजरे होत असताना. आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक नरेशबाबू पुगलिया जी यांच्या वाढदिवसानिमित्त आज 610 लोकांना एकत्र बांधण्याचं काम आपण केले आहे. मी जिल्हाप्रमुख झाल्यानंतर बाबूजी कडे आलो होतो. ते म्हणाले बाळू तुला काय पाहिजे, मी लगेच म्हणालो बाबूजी मला आपल्यासारखं बनवायचा आहे, आणि तो दिवस आला मी आज खासदार आहे. हे सर्व श्रेय श्री बाबूजींना देत आहे. त्यांच्या आशीर्वाद नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहे. . जाती धर्माच्या पलीकडे जाऊन सर्व समाविष्ट काम नरेशबाबू करीत असल्याचे मतही व्यक्त केले.
सुधीर मुनगंटीवार यांनी नवदाम्पत्याला शुभ आशीर्वाद देताना म्हटले की, बालाजी मंदिराच्या पावन भूमीत हा नेत्रदीपक सोहळा पार पडत असताना खूप सर्वांचे अभिनंदन करतो. या नव जोडप्यांना आनंद, सुख, समाधान ऐश्वर्या लाभो अशी माता महाकाली मातेच्या चरणी प्रार्थना करते. जीवनात प्रत्येकाला समाधान हाच सर्वात मोठा आशीर्वाद आहे. आणि जीवनात प्रत्येक कामात यशस्वी होण्यासाठी, नरेशबाबूजीकडे एक पद नेहमी कायम राहावे .त्यांनी शतायुषी पार करावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना करते. त्यांनी विधानसभेत काम केले. खासदार म्हणून काम केले. भगवान आपले काम वाढण्याची मनोकामना पुरी करो. मात्र बाबूजींना बोलताना तेही विसरले नाहीत. बाबूजी तुम्ही आतापर्यंत बाळूला शिवसेनेतअसतांना सुद्धा आशीर्वाद दिले. आताही आशीर्वाद दिलेत . आम्हालाही कधी एकदा आशीर्वाद द्यावा ,अशी आपल्याला ईश्वरांनी सदबुद्धी द्यावी , अशी ईश्वरचरणी मी प्रार्थना करते. आणि त्यांना वाढदिवसासाठी पुष्पगुच्छ देऊन शत: आयुष्यासाठी शुभकामना दिल्या.
माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या संकल्पनेतून चंद्रपुरात दाताळा मार्गावरील बालाजी मंदिरात 18 ते 22 मेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यास इथे कव्वाली चा कार्यक्रम पार पडला. अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन कोरोना संकटाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदा चंद्रपुरात असा नेत्रदीपक सोहळा पार पडला.  त्या  सोहळ्याचे हजारो लोकांना साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले.