चंद्रपुर शहरातील बाबुपेठ रेल्वे उडाण पूलासाठी 5.26 कोटी रु निधी मंजूर
आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्याचे फलित
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने चंद्रपुर शहरातील बाबुपेठ रेल्वे उडाण पूलासाठी 5.26 कोटी रु निधी मंजूर करण्यात आला आहे. चंद्रपुर शहरातील बाबुपेठ परिसरातील नागरिकांच्या जिव्हाळयाच्या या रेल्वे उडाणपुलासाठी निधी मंजूर झाल्याने बांधकाम प्रक्रियेला गती प्राप्त झाली आहे. शासनाच्या नगरविकास विभागाने दि. २६ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार 5.26 कोटी रु. निधीला प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.
या रेल्वे उडाणपुलासाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्न केले आहे .अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात देखील त्यांनी यासाठी निधी मंजूर करविला.चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील बाबुपेठ रेल्वे उडडाणपुलाचे बांधकाम करण्याकरिता प्रशासकीय मान्यतेनुसार रेल्वेने वहन विभागाकडून रू. १६.३१ कोटी व चंद्रपूर महानगरपालिकेने रू.५.०० कोटी तसेच महाराष्ट्र शासनाकडून रू.४०.२६ कोटी असे एकूण ६१.५७ कोटी रूपयांचे बांधकामास शासनाने १५ फेब्रुवारी २०१६ अन्वये मंजूरी दिलेली आहे.
सन 2018 -19 मध्ये आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निधी जमा केला होता.जिल्हाधिकारी कार्यालयाने सदर निधी दिला नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात जमा असलेला निधी आ. मुनगंटीवार यांनी नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांना सांगून द्याव्यास लावला आहे.नगरविकास विभागाच्या शासन निर्णय दिनांक ८ मार्च २०१९ नुसार ६७ कोटी रूपयांपैकी अखर्चित निधी फक्त २४ कोटी रूपये अद्यापही शिल्लक आहेत. त्यापैकी अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग मंडळाकडून दिनांक १७.१.२०२२ रोजी एकूण ८ कामांकरिता रू. १८ कोटी ७४ लक्ष निधी मंजूरी करिता तांत्रीक मान्यतेसह जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या दिनांक १८.१.२०२२ च्या पत्रान्वये नगरविकास विभागाला प्रस्ताव सादर केलला आहे. त्यामुळे बाबुपेठ उडडाणपुलाच्या बांधकामाकरिता उर्वरित शिल्लक राहिलेला सन २०१८-१९ चा निधी रू. ५ कोटी २६ लक्ष निधी त्वरीत उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या बाबीकडे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे व प्रधान सचिव यांचे सातत्याने पत्रव्यवहाराच्या माध्यमातून लक्ष वेधले . या संदर्भात नगरविकास मंत्री श्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निधी उपलब्ध करण्याबाबत विनंती देखील केली . आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले आहे.
दिनचर्या न्युज