आताची पिढी बिघडली नसून, ती दहा पटीने प्रगत झाली - प्राध्यापक द्वादशीवार
ज्येष्ठ नागरिकांचा निरोप व सत्कार समारंभ कार्यक्रम
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जेष्ठ नागरिक संघ रामनगर चंद्रपूरच्या कार्यकारी मंडळाची नुकतीच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत निवडून आलेल्या नवनियुक्त सदस्य नवीन कार्यकारिणी तयार करण्यात आली. मावळत्या कार्यकारिणीचा सत्कार करून त्यांना निरोप देण्यात आला. निरोप समारंभ दिनांक 14 /5 /2022 ला ज्येष्ठ नागरिक ससांस्कृती भवन चंद्रपूर येथे एडवोकेट बाबासाहेब वासाडे यांच्या अध्यक्षतेखाली आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत . प्रमुख वक्ते ,लेखक प्राध्यापक सुरेश द्वादशीवार माजी संपादक लोकमत व लोकसत्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत संघाचे अध्यक्ष महादेवराव पिजदुरकर, माजी अध्यक्ष विजय चंदावार ,गोपाळराव सातपुते ,माजी सचिव केशवराव जेनेकर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक संगीडवार व अन्य प्रमुखांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली .तर स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले .गणपतराव गहोकर यांनी प्रास्ताविक निवडणुकीपूर्वी सर्व सदस्यांना देण्यात आलेल्या वीस कलमी जाहीरनाम्याची माहिती देण्यात आली.त्यांना ज्येष्ठांना त्यांच्या हितासाठी पेन्शन मिळण्याची मागणी करण्यात आली. आरोग्याच्या ही सुविधा ज्येष्ठांना मिळवाव्या यासाठी आपण प्रयत्नशील असून ज्येष्ठांच्या हिताच्या तीन मुख्य बाबी असून त्या लवकरच आपण शासन दरबारी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार किशोर जोरगेवार यांनी समुचित मार्गदर्शन केले .
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते द्वादशीवार सर यांनी सगळेच सन्माननीय आणि जेष्ठ नागरिक म्हणून आपणही सार्थ आहात. मी तुम्हाला काही उपदेश करावा अशी अजिबात मानसिकता नाही. आपण केलेल्या मागण्या जेष्ठ नागरिकांसाठी सार्थक असून त्या योग्यच आहेत .त्यासाठी आपणच नव्हे तर प्रतिनिधी म्हणून सदनातील सर्व सभासदांनी या मागण्यांना पाठपुरावा केला पाहिजे. आपण म्हणण्यानुसार आजच्या पिढीला संस्कारा बरोबर मैत्रीसारखी संबंध जोपासले पाहिजे. आताची पिढी बिघडलेली नसून, दहा पटीने प्रगत झाल्याचे तसेच अनुभवी झाल्याचे तंत्रज्ञानाने विकसित झाल्याचे दिसून येते. आताची पिढी संस्कार आहे ,नाहीतर योग्य शिक्षणाने अनुभवाने प्रगतशील होत असल्याची उदाहरणे दिले. खरं तर त्यांना शहाणे गुरुजी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,गांधीजी त्यांच्या पुस्तकाच्या वाचण्याची गरज आहे. समाजाचे मातृदेवो भव, हा पणा अवगत करत नाही तोपर्यंत कुटुंबातील तसेच समाजातील समाजातील पिढी संत सुसंस्क्रुत होणार नाही. असे म्हणण्यापेक्षा समाजात सुसंस्कृतपणा नाही. यापेक्षा आताच्या पिढीला जातिवाद समाजवाद यापासून ही पिढी दूर असल्याचे दिसून येत आहे. यापेक्षा सगळ्यात मोठी समाजाची अडचण असेल ती सीमा बाद या वादातून बाहेर पडायचे असेल तर समाजातील प्रत्येक घटकाने सीमारेषा वाद यापासून दूर राहिले तर समाजाची अधोगतीकडे वाटचाल होणार नाही असे प्रबोधन संभाषण प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी केले. एक उदाहरण दिले न्यायाधीश असलेली मैत्री मी समोर बसला असता तिच्या मुलीने तिला माझ्या आईला काहीच कळत नाही असे म्हटले असता. आजची तरुण पिढी ही यावरच नाही थांबली तर काही वडिलांनाही नव्हे तर आपल्या गुरूजनांना ही यातलं काही कळत नाही अशावर्या रूपाने ती हुशार असं होत असते असे भावपूर्ण उद्गार त्यांनी सांगितले. यात म्हणण्याचे तात्पर्य असे की ते मुख्यमंत्र्यांनाही न्यायच्या खुर्ची समोर उभी करून न्यायदानाची शिकवण भूमिका बजावत असताना आपणच आपल्या लेख मुलांना कमकुवत वाचल्याची नवीन पिढी अशा प्रकारचे होत आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीने ज्येष्ठ नागरिकांच्या या सत्कार व निरोप समारंभात जर आपण काही घेऊन जात असेल तर महिलांना आदर सन्मान दिला पाहिजे.
या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष पंढरीनाथ गहोकर,सचिव माणिकराव गोहोकर, सहसचिव लक्ष्मणराव धोबे , कोषाध्यक्ष वसंत आवारी, सदस्य तेजराम कापगते, वसंतराव मुसळे ,डॉक्टर वसंतराव आदे, शरद उरकुडे ,रमादास अल्मस्त ,मारोतराव मते ,डॉक्टर भानुदास दाभेरे, डाँ. प्रदीप जानवे ,केशवराव चौधरी ,डॉ. ललित मोटघरे, प्रेमलाल पारधी ,अशोक हासानी त्यांनी सहकार्य केले असून या कार्यक्रमात सदस्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे संचालन अरविंद म्युंचुनवार, यांनी केले तर आभार लक्ष्मण राव धोबे यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.