आडनावावरून ओबीसींचा एम्पिरिकल डाटा गोळा करणे चुकीचे





आडनावावरून ओबीसींचा एम्पिरिकल डाटा गोळा करणे चुकीचे

शास्त्रोक्त पद्धतीने डेटा गोळा करावा- डी . के आरीकर

जिलधिकाऱ्या मार्फत मुख्यमंत्री यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे निवेदन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपुर-
महाराष्ट्रात समर्पित आयोगामार्फत ओबीसींचा एम्पिरिकल डाटा तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे.ते काम ज्या पद्धतीने सुरू आहे ती पद्धत अतिशय चुकीची असून ओबीसींवर प्रचंड अन्याय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे . आडनावावरून जात ठरविणे शक्यच नाही त्यामुळे पुढील अनेक पीढ्याचे नुकसान होणार आहे.अनेक जातीमध्ये एकाच आडनावाचे अनेक लोक राहात असल्यामुळे एम्पिरिकल डाटा गोळा करताना फार मोठा घोळ होऊन ओबीसींना आरक्षणापासून वंचित राहण्याची पाळी येऊ शकते. एकदा सर्वेक्षण होऊन सर्वोच्च न्यायालयात सादर केल्यावर मग माघार घेता येणार नाही आणिओबीसीचे फार मोठे नुकसान झाल्याचे समोर येईल.



आणि म्हणून ओबीसी समाजाची योग्य आकडेवारी प्राप्त व्हावी यासाठी शास्त्रोक्त पद्धतीनेच डेटा गोळा करावा अशी मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे व समर्पित आयोगाचे अध्यक्ष यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष डि के आरीकर यांच्या नेतृत्वात दिनांक 16 जून 2022 ला मा.जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत निवेदन देऊन केली असून शासनाचे लक्ष वेधण्याकरिता कार्याल्यासमोर आंदोलन करण्यात येऊन ओबीसी एकता जिंदाबाद! जो ओबीसी की बात करेगा! वो देश मे राज करेगा !! यावेळी ओबीसी ची जातीय जनगणना न करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल चे प्रदेश उपाध्यक्ष हिराचंद बोरकुटे, जिल्हा अध्यक्ष दलित मित्र व आदिवासी सेवक डी. के आरीकर किशोर पोतनवार , पांडुरंग गावतुरे, शालिनी महाकुळकर, राणी राव, शुभांगी डोंगरवार,, निमेश मानकर, दिनेश एकवणकर, भाऊराव झाडें बंडू डाखरे, संजय तुरीले, महेंद्र शेरकी, रेखा जाधव, नवनाथ डेरकर, वसंत ठावरी, गोविंदा ठेंगणे, अंकुश वाघमारे, मनोहर रास्पल्ले, प्रवीण वासेकर, अरुण सहारे, हंसराज वनकर वंदना डाखरे प्रकाश देवगडे, पुंडलिक आरीकर कुमार पाल यांची उपस्थिती होती.