ताडोबा पर्यटनासाठी १ जुलैपासून बंद
सध्या ३० जूनपर्यंतची बुकिंग फुल्ल
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जंगलातील कच्च्या रस्त्यांमुळे पावसाळ्यात व्याघ्रसफारी करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे दरवर्षीच पावसाळ्यात • सुमारे तीन महिने ताडोबा पर्यटनासाठी बंद असतो. यंदाही १ जुलैपासून ताडोबा पर्यटनासाठी बंद राहणार आहे. ३० जूनपर्यंतची ऑनलाइन बुकिंग फुल्ल असून, १ जुलैपासूनची कोअर क्षेत्राची ऑनलाइन बुकिंग बंद करण्यात आली आहे.
हमखास व्याघ्र दर्शनासाठी चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे. त्यामुळे देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे पर्यटनासाठी येत असतात. जंगलातील कच्च्या रस्त्यांमुळे व्याघ्रप्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवण्यात येतात. मातींचे रस्ते असल्याने संरक्षित जंगलांमध्ये भ्रमंती करणे कठीण असते. त्यामुळे
१ जुलैपासून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचा कोअर झोन पर्यटनासाठी बंद राहणार आहे, तर बफर झोन सुरू राहणार आहे.
-डॉ. जितेंद्र रामगावकर, क्षेत्र संचालक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर
ताडोबाचा कोअर झोन पावसाळ्यात पूर्णपणे बंद ठेवण्यात येतो.
यंदाही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना बघता ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात पर्यटकांसाठी मान्सून सफारी येत्या १ जुलैपासून बंद होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना केवळ बफर क्षेत्रातच पर्यटन करता येणार आहे.