गरज तिथं अभ्यासिका या संकल्पनेतुन विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिक्षा मिळणार - आ. किशोर जोरगेवार
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने आयोजित मार्गदर्शन करिअर शिबिर हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत संपन्न*
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
गरिबातल्या गरिब विद्यार्थ्याला सर्व सोयी सुविधायुक्त अभ्यासिकेत नि:शुल्क अभ्यास करता यावा हा आमचा मानस आहे. यातुनच गरज तिथं अभ्यासिका ही संकल्पना आपण राबवत असुन या संकल्पनेतुन 11 अभ्यासिका तयार करत आहोत. यातील सात अभ्यासिकांचे कामही सुरु झाले आहे. या सर्व सोयी सुविधायुक्त अभ्यासिकांमधुन विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिक्षा मिळेल अशी आशा आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केली.
रविवारी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने राजिव गांधी सभागृह येथे नितेश कराळे सर यांच्या विद्यार्थ्यी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानवरुन ते बोलत होते. या कार्यक्रमाला फिनिक्स अॅकेडमीचे संचालक नितेश कराळे यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थिती होती तर पोलिस अधिक्षक अरिवंद साळवे, माजी नगराध्यक्ष सुरेश महाकुलकर, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, सेवादलचे जिल्हाध्यक्ष सुर्यकांत खनके, रोटरी क्लबचे प्रकल्प प्रमुख अजय जैस्वाल, यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर अध्यक्षा वंदना हातगावकर, युवा शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, शिक्षण विभाग प्रमुख प्रतिक शिवणकर यांची प्रमुख पाहुणे म्हणुन मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूरचा विद्यार्थी प्रतिभावंत आहे. अपुऱ्या संसाधनातही तो प्रामाणिक मेहनत करुन शिक्षण क्षेत्रात जिल्हाचे नाव लौकिक करत आहे. अशात त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे आमची जबाबदारी आहे. या भुमिकेतून आपण मतदार संघातील शहरी व ग्रामिण भागात सर्व सोयी सुविधायुक्त 11 अभ्यासिका तयार करत असल्याचे ते यावेळी म्हणाले. 10 वी आणि 12 हे विद्यार्थी जिवनातील प्रमुख टप्पे आहेत. यापूढील शिक्षण त्यांचे भविष्य ठरवत असते. त्यामुळे 10 वी आणि 12 ची परिक्षा उत्तिर्ण झाल्यावर पूढे त्यांनी कोणत्या क्षेत्रात शिक्षण करावे याबाबत त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे या करिता आपण हे मार्गदर्शन करिअर शिबिर आयोजित केले असल्याचेही ते यावेळी म्हणाले. आपल्या मातीच्या भाषेत सोप्या पध्दतीने त्यांना याबाबत उत्तम माहिती देण्यासाठी आपण या कार्यक्रमात कराळे सर यांना बोलावले असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
चंद्रपूरचा विद्यार्थी हा परिस्थितीमुळे शिक्षणापासुन वंचित राहु नये ही आपली भुमिका आहे. आपण यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गरजु विद्यार्थ्यांना पुस्तक, शाळेचा गणेश व इतर आवश्यक त्या सर्व गोष्टी उपलब्ध करुन देत असल्याचेही ते यावेळी म्हणाले. अनेक कामांसाठी नागरिक आमच्याकडे येत असतात, मात्र शिक्षण क्षेत्रात काही तरी मदत हवी यासाठी येणाऱ्यांची संख्या फार कमी असते, हि खंत हि त्यांनी बोलुन दाखविली. असे असतांनाही शिक्षण क्षेत्रात ज्या ज्या समस्या आमच्या समोर येतात त्यावर आमचे काम सुरु आहे. अनेक अभ्यासिकांना आपण पुस्तके व संगणक उपलब्ध करून दिले असेही त्यावेळी म्हटले आहे.
*मार्कलिस्ट ही यशाची पावती नाही - नितेश कराळे*
38 टक्के घेणारा विद्यार्थी हा या देशात जिल्हाधिकारी बनु शकतो हे भारतातील शिक्षण क्षेत्राचे वैशिष्ट आहे. त्यामुळे कमी गुण मिळाले म्हणुन कधिच खचु नका प्रामाणिकतेने मेहनत करा यश नक्की मिळेल. मार्कलिस्ट ही यशाची पावती असु शकत नाही. असे प्रतिपादन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना नितेश कराळे सर यांनी केले.
ते यावेळी म्हणाले कि, प्रत्येकाला सरकारी नौकरी लागेलच अस नाही. मात्र त्यासाठी प्रयत्न न करणे हे चुकिचे आहे. काही तरी करण्याची जिद्द ही मनातुन असली की यश नक्की मिळणार. शिक्षण हे कधिही वाया जात नाही. मोबाईलमध्ये फालतुचा वेळ घालविण्यापेक्षा मोबाईलचा वापर हा नवनव्या गोष्टी शिकण्यासाठी करा असे आवाहण यावेळी बोलतांना त्यांनी विद्यार्थ्यांना केले. शिक्षण क्षेत्रात यश आणि अपयश येत राहतील आपले प्रयत्न आपण सुरु ठेवले पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. अवध्या २४ व्या वर्षी जगातिक प्रतिष्ठेची चेव्हनिंग शिष्यवृत्ती पटकाविणारा देशातील पहिला तरुण वकील चेव्हनिंग ग्लोबल लीडर अॅड. दीपक यादवराव चटप यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला हजारो विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या शिक्षण विभाग, महिला आघाडी, युथ आघाडीच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
दिनचर्या न्युज