विवेकानंद महाविद्यालयात स्टार्टअप यात्रा मार्गदर्शन सभा





विवेकानंद महाविद्यालयात स्टार्टअप यात्रा मार्गदर्शन सभा

दिनचर्या न्युज :-
भद्रावती प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरण 2018 अंतर्गत आयोजित महाराष्ट्र आणि नाविन्यता यात्रेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्थानिक विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे स्टार्ट अप यात्रा मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये नवीन तरुण-तरुणींना स्वतःच्या व्यावसायिक संकल्पना तसेच शासकीय योजना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच 2 सप्टेंबर, 2022 ला येणारी स्टार्टअप यात्रा व्हॅनला भेट देऊन राज्य पातळीवरील आयोजक यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. या अनुषंगाने महाविद्यालयात मार्गदर्शन सभा आयोजित करण्यात आली. त्याकरिता समन्वयक प्रा. धनंजय बेलगावकर, प्रा. श्रीकांत दाते, प्रा. भोजराज कापगते यांनी मार्गदर्शन केले.या अनुषंगाने होणाऱ्या स्टार्टअप संकल्पना स्पर्धेत विद्यार्थ्यांना भाग घेण्यास सांगितले.सदर कार्यक्रमाला प्रा. नरेंद्र लांबट, प्रा, रामकृष्ण मालेकर, प्रा. अनिल बलकी, प्रा. राजीव बैरम व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. सुभाष खोके यांनी केले.