बारा बलुतेदार समाजाच्या समस्या व मागण्या संदर्भात केंद्रीय मंत्री नितिन गडकरीना निवेदन




बारा बलुतेदार समाजाच्या समस्या व मागण्या संदर्भात केंद्रीय मंत्री नितिन गडकरीना निवेदन

दिनचर्या न्युज :-
नागपुर :-
नागपुर येथे महाराष्ट्र राज्य परिट (धोबी) समाज महासंघ (सर्वभाषिक) संघटनेच्या वतीने संम्मेलन आयोजित करण्यात आले होते. या संम्मेलनात समाजातील गुणवंत विद्यार्थी, नवनिर्वाचित लोक प्रतिनिधी व कोरोना योद्धांचा सन्मान आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री मा.ना.नितिनजी गडकरी साहेब,माजी मंत्री मा.चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब,आमदार मा.मोहनजी मते साहेब, आमदार मा.टेकचंदजी सावरकर साहेब,महाराष्ट्र बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष मा.कल्याणरावजी दळे साहेब,महाज्योतीचे संचालक तथा शिवसेना उपनेते मा.लक्ष्मणरावजी वडले साहेब,महाराष्ट्र परिट (धोबी) समाजाचे अध्यक्ष मा.देवरावजी सोनटक्के साहेब,एसबीसी संघर्ष समितीचे राज्य कार्याध्यक्ष मा.दत्तात्रयजी चेचर साहेब,बारा बलुतेदार महासंघाचे अकोला जिल्हाध्यक्ष मा.अनिलजी शिंदे साहेब, मा.प्रविनजी चौधरी साहेब,महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्हाध्यक्ष मा.शशिकांत ऊर्फ डुडडू नक्षिणे साहेब,मा.नगाजी निंबाळकर साहेब,मा.पंडितजी महाजन साहेब,मा.पांडुरंगजी नागतुरे साहेब,मा.निखिल मांडवकर साहेब प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी बारा बलुतेदार समाजाच्या समस्या व मागण्या संदर्भात केंद्रीय मंत्री नितिनजी गडकरी साहेब यांना निवेदन देण्यात आले.