गडचिरोली जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचा गौरवास्पद सत्कार




गडचिरोली जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांचा गौरवास्पद सत्कार

दिनचर्या न्यूज:-
गडचिरोली प्रतिनिधी:-

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बाहुबल गाव असलेल्या गावात विविध योजनाच्या माध्यमातून अनेक उल्लेखनीय काम केल्याबद्दल जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री. कुमार आशीर्वाद सर, यांचा गौरवास्पद सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषद, गडचिरोली विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी नाविण्यपूर्ण *फुलोरा उपक्रम* उत्कृष्टपणे राबवून गडचिरोली जिल्ह्यात शैक्षणिक क्रांतीची बिजे पेरली. तसेच जिल्ह्यातील कुपोषनाचे प्रमाण लक्षात घेता 15 वा वित्त आयोगातून ग्रामपंचायत च्या माध्यमाने बालकांना *विशेष आहार उपक्रम* राबवून गडचिरोली जिल्ह्यात कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी भरीव असे कार्य केले.
या भरीव आणि उत्कृष्ट कार्याचा गौरव आज 30 सप्टेबर मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कक्षात  पुष्पगुछ तथा गौरवशाली सन्मानचिन्ह  देऊन समाजभान जपणारा आदरपूर्वक सत्कार पंचायत समिती,गडचिरोलीच्या अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने करण्यात आला.या प्रसंगी पंचायत समिती, गडचिरोलीचे   बिडिओ साळवे साहेब,गट शिक्षणाधिकारी श्री यू. एन. राऊत, सहाय्यक प्रशासन अधिकारी श्रीमती पतकमवार, विस्तार अधिकारी शिक्षण श्री. एन. एस. कुमरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी श्री. एफ एस लांजेवार उपस्थित होते.