पद्मापूर डब्ल्यूसीएल मातीच्या डम्पिंग मुळे पावसाचे पाणी, गाळ शेतकऱ्यांच्या शेतात, पिकांचे नुकसान! भरपाईची मागणी

पद्मापूर डब्ल्यूसीएल मातीच्या डम्पिंग मुळे पावसाचे पाणी, गाळ शेतकऱ्यांच्या शेतात, पिकांचे नुकसान! भरपाईची मागणी

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
पदमापुर वेकोली डम्पिंगमुळे पावसाळ्याच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी आज डब्ल्यूसीएल महाप्रबंधक जीएम ऑफिस, उप प्रबंधक, तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष व पंचायत समिती सदस्य मा. पंकज भाऊ ढेंगारे,मा.अंकित ढेंगारे ग्रामपंचायत सदस्य विचोडा( रै)खैरगाव मा.अमोल पारशिवे ,जयेंद्र ताजने ,चेतन गौरकर व शेतकरी बांधव उपस्थित होते.
पद्मापूर डब्ल्यूसीएल मातीच्या डम्पिंग मुळे पावसाचे पाणी, गाळ शेतकऱ्यांच्या शेतात, पिकांचे नुकसान! भरपाईची मागणी
पद्मापूर डब्ल्यूसीएल मातीच्या डम्पिंग मुळे पावसाळा आला की मातीच्या ढिगार्‍यावरून पावसाचे पाणी सरळ चान्सूरला खैरगाव शेती शिवाराकडे व गावाकडे येथे व येथील शेती पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे दरवर्षी फार मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे नुकसानीची भरपाई डब्लू सी एल च्या  माध्यमातून लवकरात लवकर देण्यात यावी या निवेदनातून  केली आहे.