विनापरवानगी विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणे जीवावर बेतले! 12 विद्यार्थ्यांना विषबाधा पालकमंत्र्याचे चौकशीचे आदेश!




विनापरवानगी विद्यार्थ्यांना सहलीला घेऊन जाणे जीवावर बेतले!

12 विद्यार्थ्यांना विषबाधा पालकमंत्र्याचे चौकशीचे आदेश!

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.चेक बोरगाव येथिल जिल्हा परिषद शाळेची शैक्षणिक सहल लगत असलेल्या खराळपेठ जंगलाच्या गार्डन मध्ये नेण्यात आली.सोबतच चिकनाचे स्नेहभोजन करण्यात आले , मात्र सहली करिता एकाही पालकांची परवानगी घेण्यात आलेली नव्हती,शासकीय नियमाप्रमाणे सहलीच्या पूर्वी शाळाव्यवस्थापन समितीचा ठराव घेणे बंधनकारक असून शिक्षणाधिकारी यांचीही परवानगी घेणे बंधनकारक असताना कार्यरत शिक्षकाने असे काहीही केलेले नाही असे पालकांचे म्हणणे आहे.येथे एक ते चार वर्ग असून दोन शिक्षक कार्यरत आहेत व एकूण 52 विद्यार्थ्यांनी सहली करिता हजेरी लावली,त्यात एक 22 वर्षीय गावातीलच मुलगा संजय बक्षी याला मदतीकरिता शिक्षकाने सोबत घेतले होते. अशा एकूण अकरा जणांना विषबाधा झाली असून त्यांना उपचारार्थ गोंडीपीपरी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.यात भरती आत्राम,श्रावणी शेंडे,टिना बोरकुटे,खुशाल बोरकुटे,सतीश वेलादी,रुद्रमनी वेलादी,क्रीश वेलादी,आदित्य वेलादी,संस्कार झाडे,पारस झाडे आणि सुमेध बक्षी यांचा समावेश आहे.

सहलीमध्ये एकूण 52 विद्यार्थी दोन शिक्षक आणि इतरत्र तीन अशी एकूण57 जणांनी जेवणाचा आस्वाद घेतला मात्र त्यापैकी अकरा जनांनाच विषबाधा झाली कशी हाही प्रश्न प्रामुख्याने समोर येत आहे. तेव्हा या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणी पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
गोंडपिपरी तालुक्यातील चेक बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 12 विद्यार्थ्यांना जेवणातून झालेल्या विषबाधा प्रकरणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना दिल्या आहेत. चेक बोरगांव येथील जिल्हा परिषद शाळेचे 52 विद्यार्थी खराळपेठ येथे सहलीला गेले होते. जेवण करून सायंकाळी घरी आल्यानंतर 12 मुलांना मळमळ आणि उलट्या झाल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालय, गोंडपिपरी येथे भरती करण्यात आले. भरती असलेल्या सर्वांची तब्येत बरी आहे. तर इतर मुले आपापल्या घरी व्यवस्थित असले तरी त्यांची सुद्धा वैद्यकीय तपासणी करण्यात येत असल्याचे तहसीलदार यांनी कळविले आहे.