विद्यापीठाच्या पहिल्या अधिसभेत गोंडवाना विद्यापीठाच्या नव निर्मित सभागृहाला दत्ताजी डिडोळकर यांचे नाव - सदस्य गुरुदास कामडी




विद्यापीठाच्या पहिल्या अधिसभेत गोंडवाना विद्यापीठाच्या नव निर्मित सभागृहाला दत्ताजी डिडोळकर यांचे नाव - सदस्य गुरुदास कामडी...।


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली प्रथम अधिसभा दिनांक १७ जानेवारी २०२३ विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न झाली. विद्यापीठाच्या पहिल्या अधिसभेत गोंडवाना विद्यापीठाच्या नव निर्मित सभागृहाला अ.भा.वि.प.चे संस्थापक सदस्य स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्याचा प्रस्ताव अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी सभागृहात मांडला. गुरुदास कामडी यांनी मांडलेल्या प्रस्तावावर अधिसभेत दोन तास चर्चा करुण सदर प्रस्ताव मतदानाला ठेवून २२ विरुध्द १२ मतांनी प्रस्ताव पारित करण्यात आला. प्रस्तावाला डॉ. संजय सिंग,स्वप्निल दोंतुलवार, संजय रामगिरवार,प्रशांत दोंतुलवार, प्रा.धर्मेंद मुनघाटे, स्वरुप तारगे,सौ. किरण गजपूरे,यश बांगडे,प्रा.सुधिर हुंगे,व अन्य सदस्यांनी प्रस्तावाला अनुमोदन दिले.
स्व.दत्ताजी डिडोळकर १९९० ला नागपूर विद्यापीठ चे सिनेट तथा व्यवस्थापन परिषद सदस्य असतांना ,नागपूर विद्यापीठाचे उपकेंद्र गडचिरोली सारख्या आदिवासी व दुर्गम भागात सुरू करावे असा प्रस्ताव सादर केला होता. आजचे उपकेंद्र भविष्यातील आदिवासी, दुर्गम व ग्रामीण विकासाला चालणा देणारे पहिले विद्यापीठ असेल .या उदात्त हेतूने नागपूर विद्यापीठाच्या गडचिरोली उपकेंद्राचा पहिला प्रस्ताव सादर केला होता. वर्ष २००० ला गडचिरोली येथे विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु झाले. तर सप्टेंबर २०११ लख या उपकेंद्राचे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ची स्थापना झाली. गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीचा पाया स्व. दत्ताजी डिडोळकर यांनी उभारला होता. या विद्यापीठाच्या निर्मिती मध्ये स्व दत्ताजी डिडोळकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. म्हणूनच विद्यापीठाच्या नवनिर्मित सभागृहाला स्व. दत्ताजी डिडोळकर यांचे नाव देण्यात यावे अशी भूमिका अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी सभागृहात प्रस्ताव सादर करताना जोरदार मांडून सभागृहाचे लक्ष वेधून घेतले.
अधिसभेच्या सुरवातीलाच अधिसभा सदस्य गुरुदास कामडी सभागृ सदस्य सचिव तथा कुलसचिव यांच्या कडून सभागृहाच्या अवमानेचा मुद्दा उपस्थितीत करुन हरकती चा मुद्दा उपस्थितीत केला.विद्यापीठाचे कुलसचिव तथा अधिसभेचे सदस्य सचिव यांनी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ व एकरूप परिनियम २०१९ ,तसेच सभागृहाचे निर्वाचित व नामित सदस्यांची अवमानना केली आहे. याकडे सभागृहात चे लक्ष वेधून घेतले. यावर सभागृहात १तासापेक्षा अधिक चर्चा झाली.यावर कुलसचिवांनी प्रशासनाकडून चुका झाल्याचे मान्य करून सभागृहाची माफी मागितली. भविष्यात चूका होणार नाहीत याची सभागृहात हमी दिली. मा.अध्यक्षांनी यावर विद्यापीठ चे प्र-कुलगुरु डॉ. श्रीराम कावळे यांच्या अध्यक्षतेखाली अधिसभा सदस्य गुरुदास कामडी, डॉ. संजय गोरे, यश बांगडे यांची त्रिसदस्यीय समिती गठीत करून चौकशी ची घोषणा केली.