साखरवाही जनता विद्यालयातील शिक्षकाचा महाप्रताप, आपल्या जागी अनधिकृत शिक्षकाला ठेवले !





साखरवाही जनता विद्यालयातील शिक्षकाचा महाप्रताप, आपल्या जागी अनधिकृत शिक्षकाला ठेवले !

संस्थाचालक, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक व संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची रेड्डी यांची मागणी

दिनचर्या न्यूज
चंद्रपूर
साखरवाही येथील जनता महाविद्यालयात भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. मात्र यांचा महाप्रताप काँग्रेसचे घुग्घुसचे शहराध्यक्ष रेड्डी आणि उघडकीस आणला आहे. बोढे यांच्या नावावर अनधिकृत शिक्षक गेल्या काही वर्षापासून या शाळेत विद्यार्थ्यांना विद्यादानाचे धडे गिरवित आहे . हजारो रुपयांचे वेतन असलेले बोढे यांच्याकडून शासनाचे हजार रुपये वेतन उचलले जात असून, केवळ नाममात्र दहा ते पंधरा हजार रुपयांच्या रोजंदारीवर एका शिक्षकाला त्या ठिकाणी ठेवण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असल्याचा आरोप घुग्घूस शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजू रेड्डी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. याचबरोबर या प्रकरणात सह देणाऱ्या संस्थाचालक, शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, व इतरांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. स्वतः या शाळेतून शासनाची दिशाभूल करून 70 ते 80 हजार रुपये वेतन उचलून फसवणूक केली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे नुस्कान होत असून, पालकांच्या तक्रारीनुसार या शाळेत भेट दिल्यानंतर हा गंभीर प्रकार उजेडात आल्याचे रेड्डी यांनी सांगितले. विवेक बोढे हे जनता विद्यालयात नव्या वर्गाला इंग्रजी विषयाला शिकवायचे. मात्र शाळेत प्रत्यक्षात शुभम कोयाडवार हे इंग्रजी विषय शिकवत असल्याचे दिसून आले.  शाळेत प्रत्यक्ष दर्शनी पाहण्यासाठी गेले असता  लोकांना बघून कोयाडवार यांनी शाळेतून पडला. शाळेतील मुख्याध्यापकांनी या संदर्भात  उडवा उडवी ची उत्तर दिले. शुभम कोयाडवार हे संगणक शिकवतात असे सांगितले. हा प्रकार अत्यंत  गंभीर  व धक्कादायक असून या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकाऱ्याकडे केल्याची रेड्डी यांनी सांगितले.
 राजकीय वरदस्त असलेल्या   विवेक बोढे हे विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळ खेळत असून त्यांच्या या कट कारस्थानात सहभागी असलेल्या  संबंधितावरील चौकशी करून गुन्हे दाखल करण्यात यावे, तसेच तीन वर्षातील हजेरी बुक तपासून योग्य ती कारवाई करण्याची मागणी राजू रेड्डी यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे.

  राजकीय द्वेषातून  आरोप , आरोपात तथ्य नाही - विवेक बोढे
  साखरवाही जनता विद्यालयात  कोणताही अनाधिकृत शिक्षक आपण ठेवला नसून, मागील वर्षभरापासून शिकवलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल  100%लागले असून  या प्रकारनासंदर्भात ग्रामपंचायत, पालक, सामान्य नागरिक किंवा कोणत्याही शिक्षकाची तक्रार नाही. संबंधितांनी केलेले आरोप हे   राजकीय द्वेषातून असून यात कुठलेही तथ्य नाही.