चंद्रपुरात मुस्लिम धर्मीय सामूहिक विवाहाचे 26 फेब्रुवारी आयोजन





चंद्रपुरात मुस्लिम धर्मीय सामूहिक विवाहाचे 26 फेब्रुवारी आयोजन

१८ वधू-वरांचा विवाह सोहळा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात मागील चार वर्षापासून एज्युकेशनल, कल्चर असोशियन फार रुरल ट्रायबल सोसायटी चंद्रपूर द्वारा आयोजित सामूहिक मुस्लिम धर्म विवाह सोहळा 26 फेब्रुवारी 2023 ला दादमहल वार्ड कोहिनूर ग्राउंड येते आयोजित करण्यात आला आहे.
या वधू-वर सोहळ्यात 18 वधू-वरांचा विवाह संपन्न होत असून यहा विवाह सोहळा विदर्भातून चंद्रपूर ,गडचिरोली, वर्धा ,नागपूर ,अमरावती, अकोला, वनी, हिंगणघाट घुगुस राजुरा बल्लारशा या शहरातील वधू-वरांचा विवाह केला जात आहे. आतापर्यंत या संस्थेकडून 100 च्या वर वधू-वरांचे लग्न पार पडले असून. त्यांना कौटुंबिक सामान भेट दिल्या जातात. प्रत्येक वधू वर जोडप्याला किमान 70 हजार रुपयांचे सामान भेट म्हणून दिला जात आहे.
या विवाह सोहळ्यात किमान तीस ते चाळीस हजार लोकांची उपस्थिती असल्याचेही पत्रकार परिषदेतून अध्यक्ष शाहीन शेख, मल्लिका शेख, नतीशा अजू, रजिया शेख, मुस्तान शेख, यांनी माहिती दिली आहे. या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील सर्व हिंदू मुस्लिम  समाजाचे योगदान मिळत असते. म्हणून सर्वांना आवाहन करण्यात येते की आपण या विवाह सोहळ्याला शुभ आशीर्वाद देण्यासाठी  उपस्थित राहावे.