... याठिकाणी आमसभेत झाला विधवा प्रथा बंद करण्याचा महत्वपूर्ण ठराव





... याठिकाणी आमसभेत झाला विधवा प्रथा बंद करण्याचा महत्वपूर्ण ठराव



समाजात अस्तित्वात असलेली विधवा प्रथा,परंपरा समूळ नष्ट करुन महिलांना पुर्ववत सामाजिक दर्जा प्राप्त करुन देण्यांसाठी ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी पुढाकार घेण्याचे आवहान....
आमदार डाँ.देवराव होळी ,गडचिरोली


दिनचर्या न्युज :-
गडचिरोली,
पंचायत समिती,गडचिरोली आमसभा दिनांकः 22 फेब्रुवारी,2023 ला मा.डाँ.देवराव होळी ,आमदार,गडचिरोली यांचे अध्यक्षेत आयोजित करण्यांत आली होती.या सभेत विविध विकासात्सक विषयावर चर्चा अगदी शांततेत होऊन ठराव पारित करण्यांत आले.
ग्राम विकास विभाग,मंञालय,मुंबई यांचे परिपञक दिनांकः 17 मे,2022 अन्वये समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन होणेबाबत परिपञक निर्गमित करण्यांत आले आहे.आज आपण सर्व विज्ञानवादी व प्रगतिशील समाज म्हणून वाटचाल करीत असलो तरीही,पतीच्या निधनावेळी पत्निचे कुंकू पुसणे,गळ्यातील मंगळसूञ तोडणे,हातातील बांगड्या फोडणे,पायातील जोडवी काढली जाणे यासारख्या प्रथांचे समाजात पालन केले जात आहे.पतीचे निधनानंतर विधवा म्हणून पत्नीला समाजाच्या अवहेलनेस समोरे जावे लागते.धार्मिक वा सामाजिक कार्यात त्यांचा सहभागी करुन न घेणे ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला योग्य नाही.
या कुप्रथांचे पालन होत असल्याने अशा व्यक्तीला प्रतिष्ठेने जीवन जगण्याचा मानवी तसेच संविधानिक अधिकारांचे उल्लंघन होते.सदर महिलांप्रमाणे सन्मानाने जागण्यांचा पूर्ण अधिकार आहे.त्यामुळे अशा प्रथांचे निर्मूलन होणे आवश्यक आहे .याबाबत मा.हेमंत बोरकुटे,सामाजिक कार्यकर्ते यांनी आमसभेत ठराव मांडला.या ठरावाला आमसभेत उपस्थित माजी पं.स.उपसभापती श्री विलास दसमुखे यांनी अनुमोदन दिले.आणि सभागृहात सर्वानुमते मा.सभाध्यक्ष यांचे मंजूरीने ठराव पारीत केला.
वरील ठरावावार मा.आमदार महोदय व्यक्त होतांना सर्व सरपंच यांनी सर्व ग्रामपंचायती मध्ये ठराव घेऊन प्रत्यक्ष अमंलबजावणी करण्यांबाबत आवहान
धनंजय शं.साळवेप्रशासक तथा गट विकास अधिकारी पंचायत समिती,गडचिरोली यांनी कळविले आहे.