बाबूपेठे येथील बळवंतराव कडूकर यांचे निधन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
नाभिक समाजातील प्रतिष्ठित नागरिक, बँक ऑफ इंडिया येथून सेवानवृत्त झालेले बळवंतराव कडूकर यांचे वयाच्या 85 व्या वर्षी मंगळवार ला सायंकाळी पाच वाजता त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. बुधवारला दुपारी बारा वाजता त्यांच्या राहते घरून अंतयात्रा निघेल बाबूपेठ बायपास रोडवर मोक्षधाम वर अंत्यविधी होणार आहे. अचानक बळवंतराव कडूकर यांच्या निधनाने परिवारासह समाजात शोककळा पसरली असून त्यांच्या पश्चात एक मुलगा चार मुली, नातवंड असा परिवार असून त्यांच्या , परिवारांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो ! ईश्वरचरणी शांती लाभो,अशी भावपूर्ण श्रद्धांजली नाभिक समाजाकडून अर्पण करण्यात येत आहे.