चाळीस वर्षापासून अंधारात असलेली महाकाली वार्डातील झोपडपट्टी प्रकाशमय !





चाळीस वर्षापासून अंधारात असलेली महाकाली वार्डातील झोपडपट्टी प्रकाशमय !

सामाजिक कार्यकर्ते , चंद्रपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी सुधाकर कातकर त्यांच्या प्रयत्नांना यश!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर:- २ /३ /२०२३
महानगरपालिका चंद्रपूर येतील महाकाली वार्ड परिसरात काच कंपनी अस्तित्वात होती कालांतराने ती बंद झाली. मात्र याच काच कंपनीत कामगार काम करीत होते. येथे त्यांचे घर बांधून वास्तव्य आहे. एकीकडे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरी करीत आहोत मात्र या झोपडपट्टी वाशी यांना कुठल्याही सुख सुविधा मिळत नसल्याने मागील 40 वर्षापासून ही झोपडपट्टीची नागरिक अंधारात  होते.
 येथील   70 कुटुंब असणाऱ्या या झोपडवासीयांना पाणी, रस्ते नाल्या, विद्युत कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नसल्याने येथील कुटुंब अंधारात राहत होते. मात्र सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी सुधाकर कातकर यांनी  वारंवार पाठपुरावा करून,याचिका दाखल करून तो निर्णय झोपडपट्टी वासियांच्या बाजूने  आला. तरीपण दळपणाखाली राहिलेला महावितरण कंपनीने  विद्युत मीटर देण्याचे टाळत होते. राष्ट्रवादीचे नेते, सभागृहाचे विरोधी नेते  अजित दादा पवार यांना भेटून तात्काळ समस्या बाबत माहिती दिली. त्यांनी क्षणार्धाचा  वेळ न घालवता चंद्रपूर येथील संबंधित महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना तिथे मीटर लावल्यास  बाध्य  केले. आणि त्यांना 40 वर्षात अंधारात असलेल्या घरांना काल दिनांक  एक मार्च 2023 ला महावितरण कंपनीकडून विद्युत मीटर  लावण्यात आले.
 या झोपडपट्टीवासीयांनी  सातत्याने आमदार, खासदार यांच्याकडे पाठपुरावा करूनही कुठलाही त्यांना सहारा दिला नाही .अशा प्रकारचा आरोप झोपडपट्टी वाशी यांनी माध्यमातून केला आहे.  त्यांनी नेहमीच श्रीमंताच्या बाजूने उभे राहून यांना या ठिकाणी  सुविधा पासून वंचित कसे ठेवता येईल.यासाठी प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला. आता या झोपडपट्टीत सर्वांना विद्युत मीटर मिळणार असल्यामुळे या परिसरात राहणाऱ्या गोरगरीब  जनतेच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.