दिव्यांग बिरबल महाराज पाच तारखेला आत्मदहन करण्यावर ठाम ?
दिव्यांग बिरबल महाराज पाच तारखेला आत्मदहन करण्यावर ठाम?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर - कोरपणा:-
येथील बिरबल छाजुराम गुर्जर वय 65 वर्ष. मागील वीस वर्षापासून माझ्या सहाय्यतेचा , दिव्यांगपणाचा फायदा घेऊन माझ्याकडे असलेल्या दोन एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न गोपाल मालपाणी त्यांच्याकडून होत आहे. असा आरोप बिरबल यांनी केला आहे.
मी 2002 मध्ये खूप बिमार झालो होतो. माझ्याकडे पैसे नव्हते. म्हणून माझा ठाकूर नावाच्या मित्राने माझ्याकडे तर पैसे नाहीत पण गडचांदूर येथील गोपाल मालपाणी हा पैसे देतो. म्हणून त्याच्याकडे काही गहाण ठेवावा लागतो. मग पैसा देतो. असे म्हणून त्यांनी सांगितले. आणि दुसऱ्या दिवशी. दोन एकर जमीन माझ्या नावाने असलेले दस्तावेज गोपाल मालपाणीकडे गहाण ठेवून त्यांनी 50 हजार रुपये माझ्या तब्येतीसाठी आणले. माझे कागदपत्रे त्याने गहाण ठेवून घेतले. मी बरा झाल्यावर ते जमिनीचे कागदपत्र मागण्यास गेलो असता
त्यांनी स्पष्ट नकार देत ती जमीन आता माझी आहे. तू असे लिहून दिलेस. असे म्हणून तो बदलून गेला. आणि जमीन आपल्या नावाने करून घेतली.
दिनांक 10/10/2002 ला वीस रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर सहमती पत्रावर करारनामा लिहून माझ्याकडून विक्रीपत्रक लिहून घेतले. माझी फसवणूक केली. असा आरोप त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केला.
अनेक वेळा या जमिनीच्या संदर्भात मला माझ्या जागेवर येऊन मारहाण करून टाकून दिले. मला चार घंट्याचा नंतर जाग आल्यानंतर मी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथेही मला नेहमीचीच कटकट म्हणून सोडून द्यायचे. विनवणी केल्याच्या नंतर शासकीय दवाखान्यात नेऊन ठेवून द्यायचे.
वीस वर्षापासून मी यातना भोगत आहे. म्हणून आता मला न्याय न मिळाल्यास 5 एप्रिल ला आत्मदहनाचा इशारा दिला आहे. हे आत्मदहन विजय बावणे यांच्या घरासमोर करण्याच्या इशारा जिल्हा प्रशासनाला, पोलीस अधीक्षकाला, पत्रकार परिषद घेऊन माध्यमांसमोर सांगितला आहे. जर मला पाच तारखेपर्यंत मिळाला तर मी माझे जीवन संपविणार. मला जिवंत राहायचे नाही. यांच्या नेहमीच्या छळाला कंटाळून मी माझ्या हक्कासाठी माझे प्राण त्यागही करायला तयार आहे. असे सांगून मी माझ्या आत्मदहन करण्याच्या भूमिकेवर अटळ असल्याचा इशाराही प्रसार माध्यमाच्या द्वारे दिला आहे.
ही जमीन हायवे रोडला गेली असल्यामुळे लाखो रुपयाचे मोबदला मिळणार असून या पैशाचे मला काहीही करायचे नसून, हे जमीन जर निराधार ,वृद्राश्रमासाठी कोणीही आई, वडील उपाशी न  राहावे यासाठी ही जमीन  दान करून  देहीन. परंतु अशी  फसवेगिरी करून  माझी जमीन   हडपणाऱ्याला  जमीन होता कामा नये ! असे मत संत बिरबल महाराज यांनी व्यक्त केले.

 वीस वर्षा अगोदरच ती जमीन विकत घेतली- गोपाल मालपाणी
  यांना या प्रकरणाबाबत फोनवरून विचारणा केली असता. मी हे जमीन वीस वर्षा अगोदरच त्याच्याकडून विक्री पत्र करून विकत घेतली. मी त्या जागेचे प्लॉट
अकृषीक करून विकले.
 त्या जमिनीची विक्री कशा व किती रकमेत झाली असे विचारला असता . मला ते आठवत नाहीत असे गोपाल मालपाणी म्हणाले. मात्र त्याचे दस्तावेज तुम्हाला सात दिवसात दाखवते असे पत्रकारांना फोनवरून सांगितले.

    बिरबलाचे आत्मदन हा नेहमीचाच प्रकार - विजय बावणे
 बिरबल हा शेवटी बिरबल आहे. त्याने आतापर्यंत अनेक तक्रारी. अनेक वेळा आत्मदहनाचा इशारा दिला. परंतु आतापर्यंत असं काहीच घडलं नाही. असे असले तरी तो पोलीस प्रशासनाचा भाग असून ते त्यांच्याकडे लक्ष देतील मला त्याच्याशी काय? मी ह्या  जमिनीवरील प्लाट रामल्लू चौधरी  यांच्याकडून माझ्या मुलाच्या नावाने खरेदी केला.
 बिरबल हा दिवांग्यपणाचा फायदा घेऊन. फसवण्याचे काम करतो.  ती जमीन गोपाल मालपाणीची असल्याने ते काय आहे ते बघतील माझा याच्याशी काही नाही असे पत्रकारांना सांगितले.
  कोरपणा येथील पोलीस निरीक्षक  यांना या  आत्मदहन संदर्भात  विचारले असता. बिरबल  गुर्जर  यांनी आतापर्यंत अनेक वेळा आत्मदहनाचा इशारा दिला आहे. परंतु तसे आतापर्यंत काही घडले नाही. मात्र पोलीस प्रशासन त्याच्यावर कळक  लक्ष देऊन आहे .