डीजेत नाचण्यावरून झालेल्या वादात, एकाचा खुन,तिन जखमी! राम सेतू पुलावरील घटना!डीजेत नाचण्यावरून झालेल्या
वादात, एकाचा खुन,तिन जखमी! राम सेतू पुलावरील घटना!

रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

चंद्रपूर जिल्ह्यात सध्या गुन्हेगाराची प्रवृत्तीचे वाढते प्रमाण , जिल्ह्यासाठी चिंतेची बाब असून दिवसान दिवस आणि दिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहेत
चंद्रपूर शहरातील दाताळा एमआयडीसी कडे जाणाऱ्या रामसेतू पुलावर दोन गटात डीजेच्या वादावरून वाद निर्माण झाला. वाद विकोपाला गेल्याने एकाचा खून तीन गंभीर जखमी झाले असल्याची बाब समोर येत आहे.
सविस्तर वृत्त असे की दिनांक 15/ 6/ 23 ला सोमन सेलिब्रेशन येथे संदीप पिंपळकर यांच्या मुलाचे लग्न कार्य होते. त्या लग्नकार्य वाजत असलेल्या डीजेच्या गाण्यावर नाचण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला.
त्यानंतर कार्य आटोपल्यानंतर आपल्या घराकडे जाण्यासाठी निघालेल्या ओम किशोर पिंपळकर, किशोर पिंपळकर, आणि त्याच्यासोबत असलेले काही साथीदारावर गावाकडे निघाले होते. राम सेतू पुलावर वाठ पाहात असलेले आठ दहा जनानी अडवून लोखंडी राहाळने वार करून एकाचा जागीच खुन केला. मृतकाचे नाव किशोर पिंपळकर 48 वर्ष असून ते भद्रावती तालुक्यातील तिरवंजा येथील रहिवासी आहे. तर सोबत असलेले तीन जन जखमी झाले आहे. हे सर्व मारेकरी चंद्रपूर येथील बाबूपेठ, लालपेठे येथील असून पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर कलम अन्वे 302,307,324,,646,142,447,148 गुन्हे दाखल करण्यात आले.

पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.