आठ दिवसात काम पुर्ण करा अन्यथा कामगार सेने तर्फे तीव्र आंदोलन





आठ दिवसात काम पुर्ण करा अन्यथा कामगार सेने तर्फे तीव्र आंदोलन

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्हयातील खेडी-गोंडपिपरी-धाबा-मार्गाचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यासाठी हायब्रिड अन्युईटी अंतर्गत चंद्रपूर जिल्हयातील मुल-गोंडपिपरी रस्त्यांचे काम मागील जवळपास चार ते पाच वर्षापासून सुरू आहे. मात्र रखडलेल्या रस्ता बांधकामा विरोधात आज सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना संघटनेच्या वतीने संघटनेचे राज्य सचिव रामकृष्ण चिखलकर व वासिक शेख यांच्या मार्गदर्शनात कामगार सेना जिल्हा सचिव अमोल मेश्राम यांच्या नेतृत्वात आज चांदापूर येथे गावकर्‍यांना घेवून रास्ता रोको सध्द्बुध्दी आंदोलन आंदोलन करण्यात आले.




सदर रस्ता बांधकामाचा काम करण्याचा मुळ कालावधी दोन वर्षाचा होता. मात्र त्या कालावधीत जगात कोरोनाची महामारी आल्याने त्या कामासाठी विभागामार्फत मुदतवाढ देण्यात आली. मात्र कंपणीने या कालावधीत कुठलेच कामे न करता संथगतीने काम सुरू केले आहे.सदर रस्त्याचे काम संथगतीने सुरू असल्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोनला अनेकदा रितसर पत्र देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला.तसेच रस्ता बांधकामात हयगय करणार्‍या कंपनीला काळया यादीत टाका अशी मागणी सुध्दा करण्यात आली. सदर आंदोलना प्रसंगी उपविभागीय पोलिस अधिकारी मल्लिकाअर्जुन इंगळे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रतिनिधी यांना निवेदन देण्यात आले. सदर रस्ता आठ दिवसांत पूर्ण करण्यात यावे, बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारावर व सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांवर येत्या आठ दिवसात पूर्ण न केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. आंदोलनात कामगार सेनेचे जिल्हा सचिव अमोल मेश्राम यांच्या नेतृत्वात माजी महीला जिल्हा प्रमुख शिवसेना (उध्दव ठाकरे गट) प्रेमिलाताई लेंडागे,माजी जिल्हा प्रमुख शिवसेना निलिमा शेरे, तालुका प्रमुख कामगार सेना नुतन लेडांगे, रिर्चड रॉडरिक्स , मार्शल अडकिणे, प्रकाश यादव, सिध्दार्थ रेड्डी, अक्षय मेश्राम, प्रफुल्ल सागोरे,शंकर पाटेवार , तालुका संघटक रवि शेरके, सरंपच अनिल सोनूले, संदीप गिरडकर, प्रशांत बनकर,प्रकाश ताटेवार, किशोर फाले यासह समस्त गावकरी यावेळी उपस्थित होते.