युवा नेते दिवाकर निकुरे चिमूर विधानसभा क्षेत्राच्या काँगेसला देणार नवसंजीवनी...?





युवा नेते दिवाकर निकुरे चिमूर विधानसभा क्षेत्राच्या काँगेसला देणार नवसंजीवनी...?

दिवाकर निकुरे गोर-गरीब जनतेची दुःख जाणून करीत आहेत शेकडो लोकांना मदत...!

दिनचर्या न्युज :-
चिमूर (प्रतिनिधी)
कित्येक वर्षांपर्यंत चिमूर विधानसभा क्षेत्र काँग्रेसचा गड असलेला आज कुठंतरी काँग्रेस पक्ष या क्षेत्रात बरेच मागे असल्याचे चित्र दिसत आहे.या ठिकाणी सलग दोन विधानसभा निवडणूक काँग्रेस पराभूत झाले आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या क्षेत्राचे सलग १२ वर्ष या क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले आणि काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्याचे काम त्यांनी त्या काळात केलेले आहे.परंतु वडेट्टीवार यांनी जेव्हापासून ही विधानसभा सोडली तेव्हापासून इथे काँग्रेस पक्ष कमजोर झालेचे चित्र दिसले आहे आणि इथे मागील दोन टर्म भाजपाचे आमदार निवडणूक जिंकली आहे.
अश्यातच इथे आज काँग्रेस पक्षाला नविन चेहरा मिळाला असून त्यांचे नावं आहे दिवाकर निकुरे..!
निकुरे हे मागील कित्येक वर्षांपासून काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम करीत आहेत,ते विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक म्हणून समजले जातात.
दिवाकर निकुरे यांनी चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये अगदी जोमात काम सुरू केलेले आहे आणि आज ते चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची एक नवीन आशा आणि नवचेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिला जात आहे.
निकुरे यांनी मागील ७ महिन्यांपासून या क्षेत्रामध्ये सतत काम करीत आहेत आणि येवढेच नव्हे तर ते सतत या विधानसभा क्षेत्रामध्ये दौरे करीत असून काँग्रेस कार्यकर्त्यांची भेटी घेत आहेत आणि त्यांना नवचैतन्य देण्याचे काम करीत आहेत.
आता पर्यंत त्यांनी हजारो गोर-गरीब लोकांना त्यांच्या लग्नकार्यासाठी मदत म्हणून तेल-पिप्याचे,आजारी लोकांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदत,गरीब विद्यार्थांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत व गरीब लोकांचे अश्रू पुसन्याचे काम सतत ते करीत आहेत.
त्यांनी जि.प.क्षेत्राचे मेळावे घेण्यास सुरुवात केलेली आहे,याचीच सुरुवात मासळ-खडसंगी या जि.प.क्षेत्रातून केलेली आहे,अजून पुढे कार्यकर्ता मेळावे घेणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य मिळाल्याचे दिसून येत आहे.
आता पर्यंत असे चित्र दिसून येत आहे की,चिमूर विधानसभा क्षेत्राच्या काँग्रेसला युवा नेते दिवाकर निकुरे खरंच नवसंजीवनी देणार का..? हेच बघण्यासारखे आहे ....!