आज जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज पडून मृत पावलेल्यांची व जखमी झालेल्यांची माहिती





आज जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज पडून मृत पावलेल्यांची व जखमी झालेल्यांची माहिती
-
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
*पोंभूर्णा तहसील*
पोभूर्णा तालुक्यातील मौजे वेळवा माल येथे शेतामध्ये काम करीत असताना वीज पडून एक महिला मयत झालेली असून इतर सहा जण जखमी झालेले आहेत. त्यांना ग्रामीण रुग्णालय पोभूर्णा येथे भरती करण्यात आलेले आहे.
1. अर्चना मोहन मडावी, वय 28 वर्ष मयत झालेली आहे
2. खुशाल विनोद ठाकरे, वय 31 वर्ष
3. रेखा अरविंद सोनटक्के, वय 45 वर्ष
4. राधिका राहुल भंडारे, वय 22 वर्ष
5. सुनंदा नरेंद्र इंगोले, वय 45 वर्ष
6. वर्षा बिजा सोयाम, वय 40 वर्ष
7. रेखा ढेकलू कुळमेथे, वय 55 वर्ष
खुशाल विनोद ठाकरे, वर्षा बिजा सोयाम व रेखा ढेकलू कुळमेथे यांचेवर ग्रामीण रुग्णालय पोभूर्णा येथे उपचार चालू आहेत.

*नागभीड तहसील*
आज दिनांक 26/07/2023 रोजी दुपारी 03.50 वाजता शफीया सीराजुल शेख रा. नांदेड ता. नागभीड वय 17 वर्षे रोवना करण्यासाठी नांदेड येथिल शेतावर गेली असता विज पडल्यामुळे ती जखमी झाली आहे व तिला पुढील उपचारार्थ तळोधी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.

आज दिनांक 26/07/2023 रोजी दुपारी 04.00 वाजता मौजा सोनापुर तुकुम ता. नागभीड येथील रहिवासी नाव रंजन जगेश्र्वर बल्लावार यांची 1 म्हैस मौजा सोनापुर तुकुम येथे वीज पडून मरण पावलेली आहे.

*सिंदेवाही तहसील*
आज दि.26/07/2023 , दुपारी 4.00 वाजता 1)कल्पना प्रकाश झोडे वय 45 2) अंजना रुपचंद पुसतोडे वय 48 दोघी रा देलनवाडी ता सिंदेवाही यांचा शेतात विज अंगावर पडून मृत्यू झाला. तसेच सुनीता सुरेश डोंगरवार वय 35 या जखमीं झाल्या आहेत.

*कोरपना तहसील*
कोरपना तालुक्यातील मौजा चनई बुज येथील पुरुषोत्तम अशोक परचाक वय २७ हे शेतात काम करीत असताना वेळ दुपारी ४ वाजता विज पडून मरण पावले आहे.

*गोंडपिपरी तहसील*
वन मजूर भारत लिंगा टेकाम, वय ५३ वर्ष, रा चिवंढा, तहसील गोंडपिपरी, वन विभागाचे काम करत असताना अंगावर वीज पडून मृत्यू झाला आहे.

*वरोरा तहसील*
1.चारगाव या गावांमध्ये वीज पडून दोन शेळ्या मृत्युमुखी पडल्या आहेत
2. बोरगाव मोकासा गावात वीज पडल्यामुळे दोन बैल मृत्युमुखी पडले आहेत.