तलाठी लटकला 11000 ची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात





तलाठी लटकला 11000 ची लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात

- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांची कारवाई

दिनचर्या न्युज :-
चिमूर -
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका येथील साजा
म्हसली येथील तलाठी राजु विठ्ठल रगड, वय - ५६ वर्ष यांना चंद्रपूर येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी पाच वाजता दरम्यान चिमूर, आदर्श कॉलनी येथील कार्यालयात ११००० रु ची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे. तलाठी रगड यांचेकडे तालुक्यातील अडेगाव(देश.) येथील अतिरिक्त कारभार असल्याची माहिती आहे. वृत्त लिहिपर्यंत पो. स्टे. चिमूर येथे लाचलुचपत विभागाची कारवाही सुरू होती.

राजु विठ्ठलराव रग्गड, तलाठी कार्यालय म्हसली, साजा क्र. २९, (अतिरिक्त कार्यभार अडेगाव देशमुख, पळसगाव) व सुनिल महादेवराव चौधरी, मंडळ अधिकारी, सर्कल गोंदेडा तहसिल कार्यालय चिमुर, ता. चिमुर जि. चंद्रपुर यांना लाचेच्या सापळयात रंगेहात अटक तक्रारदार हे जिल्हा परिषद गडचिरोली येथून सन माहे जून २०२२ मध्ये सेवानिवृत्त झालेले

असुन ते सध्या आपले परिवारासह गडचिरोली येथे राहतात. तक्रारदार यांचे व त्यांचे भावाचे नावानी मौजा अडेगाव (देशमुख) ता. चिमुर जि.चंद्रपुर येथे गट क्र २७३ मध्ये २.८४ हे.आर.चौ.मी. शेतजमीन असून तक्रारदार यांची आत्या हिने सुध्दा नाव आहे. तक्रारदार यांची आत्या हिने सदर शेतीतून स्थावर मिळकतीवरील "हक्कसोडपत्र" (विनामोबदला बाबत रितसर दुय्यम निबंधक श्रेणी-२ चिमुर या कार्यालयातून नोंदणी करून घेतली. सदर शेतजमिनीवर तक्रारदार व त्यांचे भाऊ यांची नावे जशीच्या तशी ठेवुन आन्या हिये नाव कमी करून फेरफार करून देण्याचा कामाकरीता तकारदार यांना आरोपी राजु विठ्ठलराव रागड, तलाठी कार्यालय म्हसली, साजा क्र. २९ (अतिरिक्त कार्यभार अडेगाव देशमुख, पळसगाव) तहसिल कार्यालय चिमुर यांनी १५,०००/- रु ची लाचेची मागणी केली. परंतु आरोपी राजु विठ्ठलराव रागड, तलाठी यांना लाच म्हणून १५,००० /- रु. देण्याची तक्रारदार यांची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांचेविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कार्यालय चंद्रपुर येथे लेखी तक्रार दिली.

प्राप्त तक्रारीवरून दिनांक ०८/०८/२०२३ रोजी केलेल्या पडताळणी कार्यवाही दरम्यान आरोपी गजु विठ्ठलराव रगड, तलाठी कार्यालय म्हसली, साजा क्र. २९, (अतिरिक्त कार्यभार अडेगाव देशमुख, पळसगाव) तहसिल कार्यालय चिमुर यांनी १५,०००/- रु. लाचेची मागणी करून तडजोडीअंती ११,०००/- रूपये स्विकारण्याची तयारी दर्शविली. त्यावरून दिनांक ०८/०८/२०२३ रोजी तलाठी कार्यालय चिमुर येथील लेक्चरर कॉलनी, पाचभाई यांचे घरी किरायाने असलेल्या कार्यालयाच्या ठिकाणी पंचासमक्ष सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी यांने तडजोडीअंती ११,०००/- रु. लाच रक्कम स्वहस्ते स्वीकारल्याने त्याल पंचासमक्ष रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच सुनिल महादेवराव चौधरी, मंडळ अधिकारी, सर्कल गोंदेडा तहसिल कार्यालय चिमुर यानी तक्रारदार यांना लाच रक्कम देण्याकरिता अपप्रेरणा दिली. त्यावरून दोन्ही आरोपातांना ताब्यात घेण्यात आलेले असुन पुढील तपास कार्य सुरु आहे.

सदरची कार्यवाही ही श्री राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर. श्री. संजय पुरंदरे, अप्पर पोलीस अधिक्षक ला.प्र.वि. नागपूर, तसेच पोलीस उपअधिक्षक श्रीमती मंजुषा भोसले ला. प्र. वि. चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात श्री. प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक, तसेच कार्यालयीन स्टॉफ ना.पो.अ. संदेश वाघमारे, रोशन चांदकर, पो. अं वैभव गाडगे, अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, मपोका पुष्पा काचोळे व चालक पो अ. सतीश सिडाम यांनी यशस्वी पार पाडली आहे.

चंद्रपूर जिल्हयांतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, त्यांच्याकडे कोणत्याही शासकिय

अधिकारी / कर्मचारी यांनी किंवा त्यांचे वतीने खाजगी ईसम (एजंट) कोणतेही शासकिय काम करून देण्यासाठी कायदेशीर की व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.

श्री राहुल माकणीकर, पोलीस उपायुक्त / पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर,

श्री. संजय पुरंदरे, अप्पर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर

पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालय नागपुर