संडे मार्केटमध्ये दुकानदाराने टाकलेल्या पॉलिथिनचे प्रदूषण, मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात रविवारी आजाद गार्डनच्या बाजूला, न्यू इंग्लिश हायस्कूल आणि मधुबन कॉम्प्लेक्स या रोडवर संडे मार्केट भरत असतो. इथे चंद्रपूर शहरातील नागरिकांची चांगलीच झुंबड या मार्केटमध्ये दिसून येते. मात्र मनपाने शहरात सफाईत कुठेही प्रदूषण राहू नये याचे काटेकोर पालन केले जाते. मात्र इथे भरणाऱ्या मार्केट व्यापाऱ्याला कुठली ताकीद नसतो. सर्रास या ठिकाणी पॉलिथिन सोडून प्रदूषण करून इथे व्यापारी सोडून चालले जातात. एकीकडे शहरातील प्रत्येक घरी कचरा उचलण्यासाठी मनपाने मोहीम राबवली असताना. कुणीही दुकानदार आपल्या दुकानासमोरील कचरा रस्त्यावर टाकणार नाही म्हणून प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानासमोर ट्रस्टबिन ठेवले आहेत. मग या संडे मार्केट मधील व्यापाऱ्यांनी या कचऱ्याची विल्हेवाट स्वतः लावावी. अशी मागणी होत आहे. इथे सकाळी शेकडो नागरिक मॉर्निंग वॉकला बगीच्या बाजूच्या वॉल कंपाऊंड फिरत असतात. मात्र इथे संडे मार्केटमुळे पॉलीथीनचे प्रदूषण मुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत पाऊस जर झाला तर ते पूर्ण पॉलिथिन नाल्यात वाहून जाईल. आणि नाल्यात पॅक झाल्यामुळे या परिसरात पाणी जमा होण्याचे नाकारता येत नाही. म्हणून मनपा प्रशासनाने संबंधित संडे मार्केट मधील व्यापाऱ्यांना रस्त्यावर पॉलिसी टाकल्यास कठोर कारवाईचे निर्देश द्यावे त्यांच्यावर दंड आकारण्यात यावा. अशी मागणी आझाद बगीच्यामध्ये मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांनी केली आहे.