एखादी नवरी पळून गेल्यावर लग्न लागत नाही,तशी परिस्थिती राज्यातील सत्तेत गेलेल्या आमदाराची - विरोधी पक्षनेते ना. वडेट्टीवार



एखादी नवरी पळून गेल्यावर लग्न लागत नाही,तशी परिस्थिती राज्यातील सत्तेत गेलेल्या आमदाराची - विरोधी पक्षनेते ना. वडेट्टीवार

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेता म्हणून निवड झाल्यावर पहिल्यांदा चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले वडेट्टीवार यांनी माध्यमाची प्रतिक्रिया देताना म्हणाले की,महाराष्ट्रात दुसऱ्यांदा मी काँग्रेस पक्षाकडून विरोधी पक्षनेता म्हणून निवड केल्याने राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खरगे साहेब तसेच आमचे नेते राहुल गांधी, यांनी माझ्यावर विश्वास टाकला .त्यामुळे मुला पुन्हा संधी मिळाली. असे प्रतिपादन विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांनी केला. काही नेत्यांनी पक्ष सोडला आणि ती संधी मला मिळाली. 20-20 च्या मॅच मध्ये विजय झाले. राज्यातील विधानसभा निवडणूक डिसेंबरमध्ये केल्या जातील. त्या संदर्भाचा रागही उद्भवलेला असेल. दुर्दैवाने राज्यातील राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी एक मत नाही. ही राज्याची शोकांतिका आहे. राज्यपालांना पाठवावं लागतं. हे वर्ष निवडणुकीचे वर्ष असेल. जनतेचा राग आता उत्कर्षाला गेला आहे. त्यामुळे हा सर्व निवडणुका लोकसभा आधी घ्यायच्या. कारण जनतेला म्हणता येईल आमचा काय दोष, म्हणून त्या पूर्वीच राज्यातील काही निवडणुका घेतल्या जातील. कारण राज्यातील तीन इंजिनचे सरकार, त्यातही शिंदेंचे आमदार अस्वस्थ आहेत त्यांचे भविष्य काय? ज्याप्रमाणे एखादी नवरी पळूून जात लग्न लागत नाही अशी परिस्थिती पक्ष सोडून गेलेल्या आमदारांची झाली आहे. त्यामुळे त्यांचे राजकीय भविष्य टांगणीला लागले आहे.

देशात एक पात्री प्रयोग सुरू असून, फक्त मोदीची गुणवत्ता सुरू आहे .ही महिमा किती दिवस चालेल, विस्तार पूर्ण होईल की नाही, कारण यांना सत्ता हाच सर्वोच्च केवळ आणि केवळ राष्ट्रीय काँग्रेस आता त्यामुळे पॉझिटिव्ह झाली आहे. लोकांचा विश्वास, जबाबदारी ओळखून आम्ही जनतेसमोर जाणार आहोत आणि तो विश्वास जनता संपादन करणार मात्र शंका नसल्याचे वडेट्टीवारांनी यांनी मोदी सरकारवर खळाळून टीका केली आहे. देशातील सर्वोच्च असलेले सविधान, कायदे व्यवस्था , वन कायदा मुख्य निवडणुकीत बदल याचे षडयंत्र सुरू झाला आहे.

फक्त आणि फक्त सत्ताधाऱ्यांचे हस्तक्षेप राहील. भारताच्या सीमेवर नक्षलवाद्यासारखे जाडे राहतील. जंगल पर्यावरण साफ करून सत्ता संपत्ती त्यांच्या हातात राहील. त्या सर्वांचे संविधान तयार झाले आहे. अशी खळबळ जनक माहिती आज पत्रकार परिषदेतून राज्याचे विरोधी पक्ष नेता यांनी दिली.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे, बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत, संदिप गड्डमवार, डॉ. विजय देवतळे राजू रघाताटे, चंद्रकांत गोहोकारयां, यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रपरिषदेत वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्यातील महायुती सरकारवर टीका केली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पुलवामा येथे झालेल्या स्फोटात उपयोगात आणलेली स्फोटके कुठून आली, याचा शोध अजून लागलेला नाही. आरोपी मिळाले नाहीत. गुजरातच्या गृहमंत्र्यांची हत्या झाली, त्या प्रकरणातील आरोपीही मिळाले नाही, हे कसे काय शक्य आहे? असा प्रश्न वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

देशात दंगली पेटविल्याशिवाय भाजप सत्तेत येवू शकत नाही. गुजरातमधील गोध्रा कांडनंतर देशात भाजपला बळ मिळाले. देशात पुन्हा सत्ता मिळत नाही, याची जाणीव झाल्याने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार २०२४ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी दुसरे गोध्रा कांड घडविण्याच्या तयारीत आहे. येत्या जानेवारी महिन्यात अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिराचे उद्घाटन आहे. या कार्यक्रमात देशभरातून लाखो कारसेवक, रामभक्त सहभागी होणार आहेत. रामलल्लाचे दर्शन घेवून कारसेवक निघतील तेव्हा दंगली घडविल्या जातील, उद्रेक केला जाईल. यात काही कारसेवकांचा जीव जाईल. त्या भरोशावर देशातील सत्तेसाठी दावा ठोकला जाईल, असा खळबळजनक आरोप राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.