महाऔष्णिक विद्युत केंद्रात पाईप कन्व्हेअर बेल्ट प्रणाली प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांना समाविष्ट करा अन्यथा सी. एस. टी. पी. एस. बंद करू - संदीप गि-हे
महाऔष्णिक विद्युत केंद्रात पाईप कन्व्हेअर बेल्ट प्रणाली प्रकल्पात काम करणाऱ्या कामगारांना समाविष्ट करा अन्यथा सी. एस. टी. पी. एस. बंद करू - संदीप गि-हे

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्रात नेहमीच होणाऱ्या समस्यांना कुठलाच अंत नाही. महाजनकोचा राज्यातील सर्वात मोठा प्रथम क्रमांक असलेला. प्रदूषणावर नियंत्रण आणि कोळसा चोरीला आळा बसावा म्हणून मोठा गाजावाजा करत 180 कोटी रुपये खर्च करून सी एच पी विभाग अंतर्गत येत असलेल्या पाईप कन्व्हेअर बेल्ट प्रणाली प्रकल्प सुरू केला. पाच सहा किलोमीटर अंतरावर कोयल्याची वाहतूक करणारा बेल्ट फाटला. त्याचा फायदा घेऊन सीएसटी पी एस ने कोळशाची आयात करण्यासाठी कुठलीही निविदा न करता .आयात करण्याचे काम ट्रान्सपोर्ट लाईनच्या कंत्राटदाराला दिले. मात्र इथे काम करणाऱ्या 86 कामगारांना कामावरून काढल्याने त्या कामगारावर भूकमारीची पाळी आली आहे. एवढेच नाही तर पाईप कन्व्हेअर बेल्ट साठी बटाळी, पद्मापूर या गावातील स्थानिक लोकांच्या शेती गेल्यामुळे त्यांना कामावर समाविष्ट करण्यात आले होते. मात्र या कामगारांना कुठलीही पूर्वसूचना न देता. आपल्या नेहमीच सुरू असलेल्या कामावरून काढण्यात आले. यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गि-हे त्या नेतृत्वात मेजर गेटवर आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यात आश्वासन देऊन तिसऱ्या दिवशी उपोषण सोडण्यात आले. मात्र एक महिन्यानंतर कुठलीही आश्वासनाची पूर्ती न झाल्याने श्रमिक पत्रकार भावनात पत्रकार परिषद घेऊन जर या कामगारांना सी एस टी पी एस येथे कुठल्याही कामावर समाविष्ट करून घेतले नाही तर चंद्रपूर औष्णिक महा विद्युत केंद्र बंद पाडल्या जाईल असा इशारा आज जिल्हाप्रमुख संदीप गि-हे, त्यांनी दिला.यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रफुल सागोरे, सचिव प्रमोद कोलारकर, आणि पीडित कामगार उपस्थित होते.
सी एस टी पी एस आणि कामगार आयुक्त यांनी कुठे आश्वासन देऊन कामगारांची फसवणूक केली. असा आरोप त्यांनी केला. म्हणून आज पत्रकार परिषद द्वारे संबंधित अधिकाऱ्यांनी येत्या काही दिवसात या कामगारांना ताबडतोब कामावर न घेतल्यास शिवसेना स्टाईलने मेजर गेटस कंपनी बंद करण्याच्या इसारा पत्रकार परिषदेत दिला.