ईरई नदीपात्रातून खुलेआम रेतीची तस्करी, महसूल प्रशासन कुंभकर्णी झोपेत!





ईरई नदीपात्रातून खुलेआम रेतीची तस्करी, महसूल प्रशासन कुंभकर्णी झोपेत!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहराला लागूण असलेली ईरई नदी , ही नदी चंद्रपूरकरांची जीवनदायिनी नदी आहे. या नदीपात्रात मागील एक महिन्या अगोदर पूर आल्याने या नदीपात्रात हजारो बॉस रेती वाहत येऊन जमा झाली. त्याचाच फायदा घेऊन रेती तस्कराने नदीपात्रातील पाणी कमी होताच, रेती तस्करांनी आपला मोर्चा नदीत अवैध्य रेती उत्खलनाकडे वळविला. या नदीपात्रात अनेक अवैद्य खोदकाम करून ठेवल्यामुळे नदीपात्रातील पाण्याचे पात्र बदलल्या गेले आहेत. त्यामुळे चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती निर्माण होते. एवढेच नाही तर राष्ट्रीय संपत्तीचा -हास होतो. पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे.
विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार या नदीतून आरवट, मारडा, पठाणपुरा, विठ्ठल मंदिर वार्ड, लालपेठ, महाकाली कॉलरी , एवढेच नाही तर दाताळ्यावरून गाढवाच्या साह्याने रेतीचा उपसा करून नंतर रेती तस्कर ट्रॅक्टरचा वापर करून सर्रास रेतीची चोरटी वाहतूक करत आहेत. नदीपात्रात पोकलेन च्या साह्याने रेतीचा उपसा करून अवध्यरित्या शहरात होत असलेल्या बांधकामाचा फायदा घेत ट्रॅक्टर मागे रेती तस्कर 4000 रुपये प्रमाने ट्रॅक्टर विक्री केली जात असल्याची चर्चा होत आहे. मात्र या सर्वाकडे महसूल प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे का? अशा प्रश्न  नागरिकासह पर्यावरण प्रेमी तथा सामाजिक संस्था यांच्यातर्फे कारवाई करण्याची मागणी होत आहे.