... या मागण्यासाठी चंद्रपुरात निघाला ओबीसी समाजाचा महामोर्चा

... या मागण्यासाठी चंद्रपुरात निघाला ओबीसी समाजाचा महामोर्चा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातओबीसी समाजाच्या विविध मागण्यांना घेऊन आज ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महा मोर्चा काढण्यात आला होता.
मराठा समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ठ करु नये, महाराष्ट्र सरकारने बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे करावा, ओबीसी विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात मुला - मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृह व स्वाधार योजना सुरु करावी या प्रमूख मागण्यांना घेऊन राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला आज सात दिवस होऊ नये कुठल्याही सरकारच्या राजकीय प्रतिनिधीने साधी भेट सुद्धा दिली नाही. मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी सुद्धा याची दखल घेतली नाही. चंद्रपूर शहरात दुपारी बारा वाजता सदर मागण्यांसाठी ओबीसी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. गांधी चौकातून या मोर्चाला सुरवात झाली. या मोर्चात जवळपास आठ दहा हजार कार्यकर्ते मोर्चा सामील झाले होते. हा मोर्चा गांधी चौकातून निघून जिल्हाधिकार्यालय उपोषण स्थळी या मोर्चाची सांगता झाली.
ओबीसीच्या मोर्चा संदर्भात , समाजाच्या विविध मागण्या घेऊन उपोषणावर बसलेल्या रवींद्र टोंगे संदर्भात
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते ना. विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेतून राज्य सरकारवर निष्क्रियतेचे आरोप करीत सरकार साधी दखलही घेत नसल्याचे पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी पत्रकार परिषदेत पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी, ज्येष्ठ नेते विनायक बांगडे, विधानसभा क्षेत्राचे समन्वय डॉक्टर सतीश वारजूरकर, नंदू नागरकर, प्रवीण पडवेकर, राजेश अड्डुळ, काँग्रेसचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दिवसात राज्याचे मुख्यमंत्री, व उपमुख्यमंत्री यांनी स्वतः येऊन रवींद्र टोंगे यांचे उपोषण सोडवावे. सर्व ओबीसीच्या मागण्या लेखी स्वरुपात द्यावे असे सरकारने वचन दिले पाहिजे. सरकारने ओबीसी समाजाच्या उद्रेकाचा, व भावनांचा अंत पाहू नये!
मराठा समाजाच्या जरांगे पाटलांना का आश्वासन दिले. ते ओबीसी समाजाला कळले पाहिजे. मराठा समाजाला ओबीसीच्या वाट्यातून आरक्षण देऊ नका! ओबीसी समाजात पहिलेच 400 च्या वर जाती आहेत. 52/ टक्क्यात 20% ओबीसी बहुजन समाजाकडे आहेत त्यातही छोट्या समाजाचे प्रमाण जास्त आहेत. म्हणून या समाजातून मराठा समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र देऊ नये, सरकारने छुपा एजेंडा ठेवू नये, तोडगा काढावे आणि संबंधित आरक्षणावर चर्चा करावी.
हैदराबाद येथे काँग्रेस पक्षाने घेतला ऐतिहासिक जनहिताचा निर्णय!
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून हैदराबाद येथे झालेल्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्या ठरावात जातनिहायक जनगणना झाली पाहिजे. 50% च्या वर आरक्षणाची मर्यादा वाढवून ज्याची जेवढी संख्या तेवढा त्याचा वाटा, देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. असा निर्णय भाजपाने घ्यावा. याचा जबाब तमाम जनतेने भाजपाला विचारावा तरच जनतेने मतदार देण्याचा निर्णय घ्यावा. असे पत्रकार परिषदेतून विरोधी पक्षनेते विजय वडेटटीवारानी म्हटले.

त्या नव कंपन्यांना दिलेल्या खाजगीकरण्याच्या जीआरची होळी करा- विजय वडेट्टीवार

स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले की, सरकारने काढलेल्या खाजगीकरणाच्या पदभरती संदर्भात आपली गाथा मांडली. त्यावर वडेट्टीवर म्हणाले की, राज्य सरकारने 6 सप्टेंबरला जीआर काढला 9 कंपनींना राज्यात पद भरती संदर्भात खाजगीकरणाचे षडयंत्र सुरू झाले. यात सरकारला ओबीसीचे आरक्षण संपवायचे आहेत. तरुणाला धोका धडीला लावायचे आहे. मर्जीतील सत्ताधाऱ्याच्या लोकांनाच कंत्राट देऊन कोपोलीत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पूर्वीच्या सरकारने डाटा, कॉम्प्युटर ऑपरेटर यासारख्या लवकर भरतीला असे कंत्राट देण्यात आले होते. परंतु या सरकारने चपराच्या पासून तर इंजिनीयर असणाऱ्या सर्वांनाच या पदभरती समाविष्ट केला आहे. एकंदरीत तरुणाची फसवणूक करीत आहे. भरून यात अजित पवार सारख्या मोठ्या मोजणाऱ्या नेत्यांनी असे पाप करू नये. तुम्ही पक्ष सोडून गेला तो तुमचा विषय आहे. परंतु बेरोजगार तरुणांचे पापाचे भागीदारी होऊ नये.
त्यावेळेस 6% वरून आज सरसकट सरकारने 29 टक्के वाढ केली आहे. सरसकट तरुणांची 20 टक्क्यांनी लुटमार सेवा शुल्क किती होणार. राज्यात आज दोन लाख 14 हजार 468 जागा शिल्लक आहेत. म्हणून काँग्रेसचे नेते राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तमाल राज्यातील तरुणांना या जीआरची होळी करण्याचे आव्हान केले आहे. जर असे केले नाहीत भाजपचा आरक्षण संपण्याचा डाव खरा होईल. खाजगी नोकरी करणाऱ्या युवकांना भाजपाचा प्रचार करावे लागेल, नाही केले तर त्यांना नोकरी काढून टाकण्याचा दम दिला जाईल. म्हणून या नालायक सरकारच्या निषेध करावा असे आव्हान आज विरोधी पक्षनेते यांनी पत्रकार परिषदेतून दिले.

मनपातील अमृत योजनेत पापाचे भागीदार कोण ?

चंद्रपूर शहरात नागरिकांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी मनपा ने अमृत योजना अमलात आणली परंतु. ती कंत्राटदाराच्या नाहकर्तेपणामुळे ती पूर्णपणे अयशस्वी ठरली. यासाठी काही काल भाजपचे माजी राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी काल पत्रकार परिषद घेऊन कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावं असे जाहीर केले.
मात्र त्यावर आज विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मनपाच्या अमृत योजनेवर कळाळून टीका केली. ते म्हणाले मनपाच्या अमृत योजनेत पापाचे भागीदार कोण? हे शोधावं, पहिले त्यांना विचारावं या वाट्यात आपला हिस्सात टक्केवारी आहे की नाही? त्यांच्या जवळच  आजूबाजूला बसलेल्या  नगरसेवकासह  आयुक्तांनाही त्यांनीही टोल केले. संबंधिताची नार्को टेस्ट करावी. हंसराज अहिर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले मला आनंद झाला. सत्तेचाच माणूस सांगतो. पण आजूबाजूला बसलेल्यांनाही जरा विचारा.! अर्धसत्य बोलू नये , पूर्ण सत्य बोलावे! या लुटीत सहभागी आहेत की नाही, निव्वळ कंत्राटदाराला काळ्यायादीत  टाकणे  त्यात पूर्ण सत्य बाहेर येईल!