सावधान : पेट्रोल भरताना घ्या काळजी! ग्रामीण भागातील पेट्रोल पंपवर डेन्सिटीचा आकडाच नाही, ग्राहकांची होतोय फसवणूक! जागो ग्राहक जागो,! दरात आणि डेन्सिटी फरक तर नाही ना, जरा तपासा ! ग्राहकांची होतोय फसवणूक!सावधान : पेट्रोल भरताना घ्या काळजी!


ग्रामीण भागातील पेट्रोल पंपवर डेन्सिटीचा आकडाच नाही, ग्राहकांची होतोय फसवणूक!

जागो ग्राहक जागो,! दरात आणि डेन्सिटी फरक तर नाही ना, जरा तपासा ! ग्राहकांची होतोय फसवणूक!

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर:-

राज्य आणि केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलचे दर शासन दर पत्रकानुसार ठरवून दिले आहे. पेट्रोल पंप धारक नियम धाब्यावर बसवून ग्राहकांची दिशाभूल करून

पेट्रोलपंपवर सर्रास ग्राहकांच्या खिशाला कात्री लावत आहेत. ग्रामीण भागातील पेट्रोल पंप वर सेल्स मॅनेजरचे सक्षम दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत असून यात सर्रास ग्राहकाची लूट होत आहे. आज असाच प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील  शेगाव येथील भारत पेट्रोल पंप, आणि हिंदुस्तान पेट्रोल पंप या दोन्ही पेट्रोल पंप वर डेन्सिटीचा आकडाच नाही. पेट्रोल पंप वर घनता नसल्याने ग्राहक संभ्रमात असून पेट्रोल पंप वर भेसळ तर नाही ना असा ग्राहकात संभ्रम निर्माण होत आहे.
सेल्स ऑफिसरच्या अर्थपूर्ण व्यवहाराने पेट्रोल पंप धारकावर आशीर्वाद असल्याचे आता पेट्रोल पंप वर काम करणारे कर्मचारी गुप्ता आवाजात बोलत आहेत. आता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सेल ऑफिसरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या संदर्भात सेल्स मॅनेजर ला फोन करून विचारले असता. त्यांनी संबंधित मशीन ही 2019 नंतर ची असून त्याची डेन्सिटी रजिस्टर वर सकाळी नोंद केली जाते. नवीन पेट्रोल पंप असला तरी, मशीन जुनी असल्याने मशीनवर डेन्सिटी आकडा दिसत नाही, अनेक तक्रारी येतात, ज्यांना डाऊट वाटल्यास पाच लिटरच्या माप मध्ये त्या डेन्सिटीचा आकडा चेक करावे असे पळवाट करून उत्तर दिले. मात्र ग्राहकांना रजिस्टर वर जाऊन डेन्सिटी करण्याचा वेळ असतो का? संबंधित ग्राहक हा मशीन वर पेट्रोलच्या दरानुसार, मशीनवर डेन्सिटी आकडा बघत असतो, मात्र इथेच ग्राहकाची दिशाभूल केली जाते.
पेट्रोल पंप धारकाने संबंधित कंपनीच्या सेल्स मॅनेजर ला वारंवार डेन सिटी बाबत कळवले असताना सुद्धा ते कुठल्याही प्रकारची कारवाई करत नसल्याचे म्हटले आहे. पेट्रोल पंपचे सेल्स ऑफिसर नाममात्र महिनेवारी भेट देऊन आपली दुकानदारी चालवीत असतात. या दुकानदारीतून मुनाफा भेटला की सेल्स ऑफिसर डोळे झाक करून निघून जातो. मात्र यामुळे सामान्य माणसाच्या खिशाला पेट्रोल पंप मालकाकडून चुना लागतो.

म्हणून ग्राहकांनी घनता असलेल्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरावे जेनेकरून आपली फसवणूक होणार नाही! 

पेट्रोल पंप वरील डिस्प्ले बंद असून, डेन्सिटी 00kg/m3 असून पेट्रोल दर 106.22 असा आहे.

यात सर्रास शासनाची, ग्राहकाची दिशाभूल केली जात आहे. नियमाप्रमाणे(density) डेन्सिटी 730 kg/m3 ते 750kg/m3 च्या वर असायला पाहिजे मात्र या पेट्रोल पंप वर कोणत्या भावाने पेट्रोल विक्री केल्या जात आहे. यांचे मशीनवर डिस्प्ले बंद असून यामागे पेट्रोल पंप मालक व सेल्स मॅनेजर चा ग्राहकांना लुटण्याचा सर्रास प्रकार होतो का? . ग्राहकांना दिलेल्या बिलामध्ये संबंधित पेट्रोल पंप ची माहिती डेन्सिटी, पेट्रोलचे दर देणे बंधनकारक असताना सुद्धा सर्व नियम धाब्यावर बसून सर्रास ग्राहकांची दिशाभूल पेट्रोल पंप धारक करत आहेत. म्हणून संबंधित पेट्रोल पंप धारकांच्या क्षेत्रीय कार्यालयीन अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन ग्राहकाची होत असलेली दिशाभूल पेट्रोल पंप वर डेन्सिटीची नोंद करून थांबवावी ही ग्राहकाची मागणी होत आहे.