अवैद्य व्हिडिओ गेम पार्लरचा संचालक काँग्रेसनेता गिरफ्तार.....?

अवैद्य व्हिडिओ गेम पार्लरचा संचालक, काँग्रेसनेता गिरफ्तार.....?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात अनेक दिवसापासून व्हिडिओ गेम पार्लरच्या नावाखाली जुगार, चालत असल्याची कुण कुण शहरात होती. परंतु त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नव्हती. या संदर्भात काही दिवसापूर्वी आंदोलनही करण्यात आले होते. परंतु राजकीय दबावापोटी या नेत्यांच्या व्हिडिओ गेम पार्लरवर कुठलीही कारवाई होत नव्हती. एक प्रकारचा जुगार असून अनेक कुटुंब यामुळे उध्वस्त झाले होते. याची दखल घेऊन काही दिवसांपूर्वीच बातमी प्रकाशित झाली होती. त्याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी तत्काळ या व्हिडिओ गेम पार्लरच्या मागील काय सत्य ते पडताळून पाहून कारवाईचे आदेश दिले. काल पडोली येथे चालत असलेल्या व्हिडिओ गेम पार्लरवर कारवाई झाली.
आज चंद्रपूर रामनगर पोलीस ठाण्यात येत असलेल्या सपना टॉकीज परिसरातील काँग्रेस नेता, असंघटित कामगार कमिटीचा जिल्हाध्यक्ष विनोद संकत याच्या अवैद्य शुरू असलेल्या व्हिडिओ गेम पार्लरवर धाड टाकून रामनगर डीपी पथकाने चार व्हिडिओ गेम मशिनी जप्त केल्या. व्हिडिओ गेम पार्लर च्या नावाने सर्रास जुव्याचा काळाबाजार सुरू होता. काँग्रेस नेत्यावर झालेल्या कारवाईने शहरात चांगलीच खळबळ सुरू आहे. या कारवाईने शहरात सुरू असलेल्या अनेक व्हिडिओ गेम पार्लर ने आपल्या दुकानदारा बंद केल्या आहेत. शहरात आता अनेक व्हिडिओ गेम पार्लरवर कारवाई होणार या भीतीने व्हिडिओ गेम पार्लरच्या संचालकाचे धाबे दणाणले आहेत. रामनगर पोलिस ठाण्यात कारवाई सुरू असून कुठल्या कलमाखाली गुन्हे दाखल झाले याची माहिती रामनगर पोलीस ठाण्यातून यायची होती. पुढील कारवाई काय झाली या संदर्भाची माहिती लवकरच प्रसार माध्यमात येईल.