डीएन आर ट्रॅव्हल्स भ र रस्त्यातच प्रवासी भरलेल्या खाजगी टँकरने भरते डिझेल , दुर्घटना झाल्या जबाबदार कोण?

डीएन आर ट्रॅव्हल्स भ र रस्त्यातच प्रवासी भरलेल्या खाजगी टँकरने भरते डिझेल , दुर्घटना झाल्या जबाबदार कोण?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यात डी एन आर ट्रॅव्हल्स ही नागपूर ते चंद्रपूर या मार्गावर सतत धावत असते. एक उत्कृष्ट सेवा म्हणून या ट्रॅव्हल्स कडे सुरुवातीला प्रवाशांचा कल होता. परंतु अल्पावधीतच कर्मचाऱ्यांची मनमानी आणि ट्रॅव्हल्सच्या मालकाची मुजोरी ही प्रवाशांना नडू लागली होती. अनेकदा नागपूर चंद्रपूर महामार्गावर डी एन आर ट्रॅव्हल्सचेअपघातही झाले, त्यात डी एन आर ट्रॅव्हल्स च्या चालकाची चुकी होती हे ही निष्पन्न झाले. परंतु डी एन आर ट्रॅव्हल्स यांनी कुठलाही बोध घेतला नाही. सोमवारी सकाळी साडेसात वाजता निघालेली नागपूर चंद्रपूर डी एन आर ट्रॅव्हल्स जिचा क्रमांक एम एच 34 बी एच 7877 ही प्रवाशांना घेऊन चंद्रपूरला सकाळी सव्वा अकरा वाजता वडगाव फाट्यावर पोहोचली. त्याच्या थोड्यासमोर आल्यानंतर ही ट्रॅव्हल्स अचानक थांबली. त्यानंतर डी एन आर लिहिलेले एक डिझेल टँकर या ट्रॅव्हल्स च्या बाजूला येऊन थांबले. आणि त्या टँकर मधून दिवसाढवळ्या आणि तेही रहदारीच्या मार्गावर डी एन आर ट्रॅव्हल्स मध्ये डिझेल भरू लागले. हे दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद करत असतानाच डिझेल भरणारे कर्मचारी उर्मटपणे, तुम्हाला चित्रीकरण करायचे असेल तर करा आमचं कोणीच वाकड करू शकत नाही. कारण सर्व अधिकारी आमच्या मालकाच्या खिशात आहेत अशी भाषा बोलू लागले. त्या ट्रॅव्हल्स फुटलेल्या काच असून असा काच ठेवणेही गुन्हा आहे.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना हा प्रश्न पडला आहे की, खरंच अधिकारी यांच्या खिशात आहेत का? मुळात वारंवार याच्या तक्रारी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडे करण्यात आल्या आणि त्यांच्यावर कारवाही करण्यात आल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर सुद्धा डी एन आर ट्रॅव्हल्सच्या मालकाची मुजोरी कायम आहे. त्यामुळे ह्या डी एन आर ट्रॅव्हल्स च्या मालकाला राजकीय वरदहस्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भर रस्त्यावर डिझेल भरताना चुकूनही आग लागली तर ट्रॅव्हल्स मध्ये बसलेले प्रवाशासहित रस्त्यावर येणारे जाणाऱ्या नागरिकांनाही याचे दुष्परिणाम भोगावे लागणार हे निश्चित. त्याचप्रमाणे डी एन आर ट्रॅव्हल्सच्या अनेक बसेस प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकापासून ते विश्रामगृहापर्यंत रांगेने उभ्या असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. 

परंतु याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. एकंदरीत चंद्रपूर जिल्हा प्रशासनातील सर्व संबंधित अधिकारी हे डी एन आर ट्रॅव्हल्सच्या दावणीला बांधले आहेत असे निदर्शनास येत आहे. या सर्व प्रकाराची लेखी तक्रार जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, पुरवठा अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. आता बघूया की हे अधिकारी या ट्रॅव्हल्सच्या मालकावर काय कारवाई करतात?... की..?