गडपिपरी ग्रामपंचायत सरपंच्या जयमाला बोरकर विरुद्ध अविश्वास ठराव पारित




गडपिपरी ग्रामपंचायत सरपंच्या जयमाला बोरकर विरुद्ध अविश्वास ठराव पारित

दिनचर्या न्युज :-
चिमुर -
भिसी येथून ५ किमी अंतरावरील गडपिपरी गटग्रामपंचायतीच्या सरपंच जयमाला युवराज बोरकर यांच्याविरुद्ध शुक्रवारी सहा विरुद्ध एक मताच्या फरकाने अविश्वास प्रस्ताव पारित झाला. सरपंच जयमाला बोरकर या इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात, असा आरोप करून ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध ९ ऑक्टोबरला तहसीलदारांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. त्यावर शुक्रवारी गडपिपरी गटग्रामपंचायतमध्ये चिमूरच्या तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांच्या उपस्थितीत मतदान घेण्यात आले. गडपिपरी गटग्रामपंचायत ही नवेगाव, गोठणगाव व गडपिपरी ही तीन गावे मिळून बनलेली आहे.

सात सदस्य असलेल्या या
ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जाती सर्वसाधारणसाठी सरपंचपद राखीव होते. त्या आरक्षणातून जयमाला बोरकर १८ जुलै २०२१ ला सरपंच झाल्या होत्या. २७ महिन्यांचा कार्यकाळ त्यांनी पूर्ण केला.
अनुसूचित जाती सर्वसाधारण पदासाठी राखीव असलेले सरपंच पद आता गडपिपरी येथील चंदू पाटील किंवा सरिता शामकुडे यापैकी कुणाकडे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. जयमाला बोरकर 27 महिन्याच्या कार्यकाळात अनेक वेळा वादग्रस्त राहिले आहेत. त्यामुळे गट ग्रामपंचायत गडपिपरी येतील ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव पारित करण्याचे प्रस्ताव दाखल केला होता.