श्री संत नगाजी महाराजांच्या शोभायात्रेने चंद्रपूर नगरी दुमदुमली
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात श्री संत नगाजी महाराज उत्सव सुरू असून काल शहरात निघालेल्या श्री संत नगाजी महाराज शोभायात्रेने चंद्रपूर शहर भव्य दिव्य शोभा यात्रेने दुमदुमले. श्री संत नगाजी महाराज मंदिर समाधी वार्ड येथून निघालेली भव्य दिव्य शोभायात्रा चंद्रपूरकरांचे लक्ष वेधत होती. नाभिक समाजाच्या तर्फे दरवर्षी श्री संत नगाजी महाराज पुण्यतिथी उत्सव पार पडत असतो. यावर्षी नाभिक समाजातर्फे भव्य शोभायात्रा व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. काल महाराजांची घटस्थापना, रांगोळी स्पर्धा, पाक कला स्पर्धा, भव्य दिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भद्रावती येथील युगप्रवर्तक ढोल ताशाच्या शोभा यंत्रेची आकर्षण होते. शोभायात्रेत सात भजन मंडळी ही सहभागी होते. त्यात खास करून नाभिक समाजातील महिलांनी लेझीमचे प्रदर्शन करून चंद्रपूरकरांचे मने आकर्षित केले. तिच्या गजरात काढण्यात आलेल्या श्री संत नगाजी महाराज भव्य प्रतिमा सजविलेल्या गाडीवर ठेवण्यात आली होती. मोहनराव चांदेकर यांच्या स्वरूपात श्री संत नगाजी महाराज प्रगट झाल्याचे प्रतिमा दिसून येतो ती शोभा यात्रेचे आकर्षण होते. यात मोठ्या प्रमाणात नाभिक समाज सहभागी झाले होते.
शोभायात्रेत पोलीस प्रशासनाचे महत्वाचे योग्य दर राहिले असून शांततेत मिरवणूक निघल्याचे पोलीस प्रशासनाकडून धन्यवाद व्यक्त करण्यात आले. कुठल्याही समाजाची मिरवणूक ही अशी शांततेत व स्वयमतेने निघावे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले. उत्सव समितीचे अध्यक्ष श्याम राजूरकर यांच्या नेतृत्वात शोभायात्रा काढण्यात आली यावेळी नगाजी वस्तीगृहाचे अध्यक्ष गिरीश कडूकर, उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष सुशांत नक्षीने, दत्तूभाऊ कडूकर, संदेश चलिलवार,
रामदासजी अतकरे, विजय मांडवकर,हेमंत नक्षिणे
श्री. प्रकाश चांदेकर, श्री. प्रशांत सुर्वे, श्री. दिनेश एकवनकर, श्री. शंकरराव नक्षणे, प्रशांत पांडे, राजू कोंडस्कर,सौ. सरोजताई चांदेकर, संध्या कडूकर , श्री. वसंतराव बडवाईक, डॉ. श्री. पुरुषोत्तन कडूकर, श्री. प्रभाकर चौधरी, श्री. शांतारामजी पुंडकर, श्री. प्रकाश सुर्वे, श्री विलास बडवाईक, श्री. दिपक लक्षणे, श्री. संतोष अतकरे, श्री मनोहरराम चौधरी, श्री. गणेश कडूकर, श्री. प्रभाकरराव कडवे, श्री. केयुज कडूकर, श्री. रितेश राजूरकर, श्री मानिकचंद चत्रे, श्री. प्रकाश नागरे, श्री. महेश नक्षिगे, श्री. प्रफुल बनस्कर, श्री. भुपेंद्र लांजेवार, श्री. भारत उरकुडे, श्री. बंटी लांजेवार, श्री. घंटी बडवे, श्री. राहुल विरूळकर,
यासह शेकडो समाज बांधवांनी, शोभायात्रेत आपले महत्त्वाचे योगदान देऊन शोभायात्रा यशस्वी केली.