चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धांचे आयोजन





चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धांचे आयोजन



दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा. पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, चंद्रपूर व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शालेय मैदानी 19 वर्ष आतील मुला मुली क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 26 ते 31 डिसेंबर 2023 रोजी तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर येथे आयोजित करण्यात येत आहे.
19 वर्ष आतील मुले मुली आयोजनाचा मान महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्हा यांना मिळाला आहे.
भारतात सन 2036 मध्ये होणाऱ्या ऑलम्पिक स्पर्धा करण्याचा मानस व्यक्त केला असून तालुका क्रीडा संकुल बल्लारपूर जिल्हा चंद्रपूर येथे प्रथमच राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा 19 वर्ष मुले मुली आयोजन होत आहे. अशी माहिती आज नियोजन भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेतून जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वने व सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांची उपस्थिती होती.
भव्य दिव्य होत असलेल्या स्पर्धेत संपूर्ण देशातील 28 राज्यातून आठ केंद्र शासन राज्यातून खेळाडू, संघ व्यवस्थापक एकूण तीन हजार खेळाडू व संघ व्यवस्थापक दोनशे उपस्थित राहणार आहेत. यासाठी राष्ट्रीय मैदानी क्रीडा स्पर्धा आयोजनाकरिता विशेष बाब म्हणून निधी उपलब्ध करून दिली आहे. खेळाडूंची येण्या जाण्याची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था शहरात वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येणार आहे. अशी माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
ते म्हणाले की नरेंद्र मोदी पंतप्रधान यांनी भारतात सन 2036 मध्ये ऑलम्पिक स्पर्धा आयोजन करण्याचं मानस व्यक्त केला आहे. त्या दृष्टीने 2023-24 पासून राष्ट्रीय शालेय मैदानी स्पर्धा हा प्रथमच मान चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात मिळालेला आहे.
मशाल रॅली चंद्रपूर जिल्ह्यात आगमन होताना भव्य स्वरूपात स्वागत करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेच्या उद्घाटन समारंभ 27 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भव्य दिव्य स्वरूपात होणार आहे.
अधिकृतपणे आपण या कार्यक्रमाचे उद्घाटन करतो आहे.माननीय मुख्यमंत्री क्रीडा मंत्री संजय बनसोडे या केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरजी त्यांनाही मी निमंत्रण देऊया इतर काही मान्यवरांनाही आपण निमंत्रण देतो आहे. उद्घाटन आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक विरासत जपायची आहे.
सायंकाळी क्रीडास प्रकार संपल्यानंतर रोज सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात विविध एकविध क्रीडा संघटना व क्रीडा संघटना, क्रीडा मंडळ, एनजीओ, समाजसेवी संस्था, नेहरू युवा केंद्र, एनसीसी, स्काऊट गार्ड, या माध्यमातून विविध रॅली, स्कूटर बाईक रॅली, टॉर्च रॅली, शोभायात्रा काढून विविध उपक्रम आयोजन करण्याकरिता क्रीडा क्षेत्रातील नामवंत व्यक्तीची व खेडाळूला सहभागी करून क्रीडामय वातावरण निर्मिती करिता ढोल पथक पुणेरी ढोल नाशिक ढोल नागपुरी ढोल पथक राहणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत संबंधित ची माहिती टोल फ्री क्रमांक 18003096030 उपलब्ध आहे. समन्वय साधण्यासाठी कॉल सेंटर मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. संपूर्ण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी 14 समित्या गठीत करण्यात आले आहे. अशी माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आली आहे.