शासकीय सुट्टी नसताना ग्रा. पा.पु. उपविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कार्यालयाला खो ! chandrapur zdp-chandrapur.html
शासकीय सुट्टी नसताना ग्रा. पा.पु. उपविभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा कार्यालयाला खो !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद उपविभाग चंद्रपूर येथील अभियंता, अधिकारी कर्मचाऱ्यांचा कार्यालयाला खो ! सुळसुळाट असल्याने कामानिमित्त आलेल्या नागरिकांना परत पावलांनी जावे लागले. फक्त चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी कार्यालयात उपस्थित होते, बाकी कर्मचारी अधिकाऱ्यांनी कार्यालयाकडे फिरकले नाहीत.
ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागातील गोंडपिपरी, बल्लारपूर, भद्रावती, येथील उपअभियते नेहमीसाठी ठाण म्हणून बसले आहेत. तीनही तालुक्यातील या विभागाचा कारभार येथूनच हलवत असतात. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकारी लक्ष देतील का?
सध्या दिवाळी सणानिमित्त काही दिवसाच्या सुट्ट्या सुरू आहेत. जिल्हाधिकारी यांनी आपल्या अधिकारातील शुक्रवारी सुट्टी जाहीर केल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी पडता पाय घेतला. मात्र शासकीय कार्यालय सोमवारी सुरू असल्याने कुणी शासकीय कार्यालयाकडे अधिकारी, कर्मचारी भटकले नाही. संबंधित विभागातील अधिकारी ,कर्मचारी यांनी या दिवसाचा रजेचा  अर्ज कार्यालयात केला का हा प्रश्न  आता सर्वसामान्य नागरिकांना उपस्थित होत आहे. या कार्यालयात  कामासाठी येणाऱ्या नागरिकांना मात्र आल्या पावली परत जाण्याची वेळ आल्याने  नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
 दिवाळीच्या सुट्ट्याने अनेक कार्यालयात सोमवारी कार्यालय सुरू होते. परंतु या ठिकाणी अनेक कर्मचारी अधिकाऱ्यांनी एक दिवसाची सुट्टी परत दुसऱ्या दिवशी येत असल्याने  अनेकांनी  कार्यालयात येण्यास  अधिकारी, कर्मचाऱ्यांनी 'खो' दाखवला.
 सोमवारीला अनेक कर्मचारी ,अधिकारी सुट्टीवर असताना यांच्या हजेरीपटावर खरंच हजेरी लागेल का? हा प्रश्न मात्र  वरिष्ठ  अधिकाऱ्यांकडे उपस्थित होत असून, या हजेरीपटाच्या रजिस्टरची पडताळणी होईल का?