वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघाला शेतकरी बाजारपेठे करिता जिल्हा अधिकाऱ्याने दिली मंजुरी


                                   

वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघाला शेतकरी बाजारपेठे करिता जिल्हा अधिकाऱ्याने दिली मंजुरी

दिनचर्या न्युज :- 
चंद्रपूर :- 
       वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघ हा सर्व शेतकरी उत्पादक  कंपन्याचा संघ असून.महासंघाची घोडदौड विदर्भातील शेतकऱ्यांची एकमेव अग्रेसर चळवळ म्हणुन कार्यरत दिसत आहे. महासंघाचा एकच ध्यास शेतकऱ्यांचा विकास ह्या एकमेव लक्षाला सामोरे ठेऊन महासंघ कार्य करित आहे.महासंघात एकूण 67 कंपन्या जुळलेल्या असून चंद्रपूर जिल्ह्या व्यतिरिक्त वर्धा यवतमाळ व गडचिरोली जिल्ह्याच्या कंपन्या ही जुळलेल्या आहेत.तसेच नव्याने बऱ्याच कंपन्या जोडल्या जाणार आहे. 
       असे असताना दिनांक 01 नव्हेंबर 2023 रोज बुधवारला जिल्हा अधिकाऱ्यानी स्मार्ट योजनेशी निगडित आढावा बैठक आयोजित  केली होती.ज्यात संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गा सोबतच वैनगंगा व्हॅली शेतकरी उत्पादक महासंघाच्या सर्व संचालक मंडळालाही प्राचारण करण्यात आले होते.त्यात स्मार्ट योजनेचा आढावा झाल्यानंतर महासंघाला शेतकरी बाजारपेठ निर्माण करण्यासाठी आत्मा प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या परिसरात परवानगी देण्यात आली.त्या संदर्भात महासंघाच्या वतीने सर्व संचालकांनी जिल्हा अधिकारी विनय गौडा यांचे आभार मानले व पुष्पगुच्छ देऊन निर्णयाचे स्वागत केले.
तरी ह्या बैठकीत प्रशासनाच्या वतीने जिल्हा अधिकारी श्री. विनय गौडा,जिल्हा नियोजन व पालक मंत्री चंद्रपूर यांचे स्वीय सहाय्यक अधिकारी श्री.विजय इंगोले,जिल्हा कृषी अधीक्षक श्री.शंकर तोटावार,आत्मा प्रकल्प संचालक प्रीती हिरडकर मॅडम, 
, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. काळे साहेब, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी श्री.उमेश हिरूडकर सह इत्यादी वर्ग उपस्थित होता.
   तसेच महासंघाच्या वतीने अध्यक्ष नरेंद्र जिवतोडे,संचालक मंडळातील श्री. राजेश केडझरकर, श्री.बंडू डाखरे,श्री.अशोक गायकवाड, श्री.सतीश बावणे, श्री.फुलबांधे,श्री.आमले सह प्रसिद्धी प्रमुख भोला मडावी व महासंघाचे विविध पदाधिकारी आणी सदस्य उपस्थित होते.

दिनचर्या न्युज